Google-Doodle: महाराष्ट्राचे पहिले ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांना गुगलकडून मानवंदना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

KD Jadhav 97th Birth Anniversary Google Doodle: मुंबई: स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक (Olympic Medal) जिंकणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव (Khashaba Dadasaheb Jadhav) यांची आज (15 जानेवारी) 97 वी जयंती आहे. याच निमित्ताने गुगलने (Google) त्यांना खास मानवंदना दिली आहे. कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेले केडी जाधव (K. D. Jadhav) यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर नावाच्या गावात झाला होता.

ADVERTISEMENT

एकीकडे गुगलसारख्या दिग्गज विदेशी कंपनीने खाशाबा जाधव यांचा सन्मान केलेला असताना दुसरीकडे अद्यापही देशातील सरकारने त्यांच्या या कामगिरीची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. देशासाठी कुस्तीत पहिलंवहिलं वैयक्तिक पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांना अद्यापही सरकारने पद्म पुरस्कार दिलेलं नाही.

गुगलने आज खास डूडल (Google-Doodl) तयार करून ‘पॉकेट डायनॅमो’ या नावाने ओळखले जाणारे कुस्तीपटू खाशाबा जाधवांचे स्मरण केले आहे. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी जर्मनी, मेक्सिको आणि कॅनडाच्या खेळाडूंना पराभूत करून कांस्य पदकाची कमाई केली.

हे वाचलं का?

मात्र, 1952 पूर्वीच कोल्हापूरच्या महाराजांनी या कुस्तीपटूच्या प्रतिभेची दखल घेतली होती. 1948 च्या लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जाधव यांच्या सहभागासाठी त्यांनी निधी देण्याचा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमांची सवय नसतानाही आणि अत्यंत अनुभवी कुस्तीपटूंविरुद्ध स्पर्धा करत असतानाही जाधव सहाव्या स्थानावर राहिले होते, जे त्या काळात भारतीय कुस्तीपटूचे सर्वोच्च स्थान होते.

खाशबा जाधवची खास गोष्ट म्हणजे ते इतर पैलवानांसारखे उंच आणि तगडे नव्हते, तरीही त्यांच्याशी कुस्तीचा सामना करण्यास अनेक दिग्गज पैलवान उत्साही असायचे. खाशाबा जाधव हे फक्त 5 फूट 5 इंच उंचीचे होते. असे असतानाही त्यांनी कुस्तीत आपल्यापेक्षा उंचीने अनेत मोठ्या पैलवानांना सहज चितपट केलं होतं.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या ‘फुलराणी’च्या मार्गात कोरोनाचा अडसर, ऑलिम्पिक स्वप्नासाठी हवेत आर्थिक पाठबळाचे पंख

ADVERTISEMENT

वयाच्या 10व्या वर्षापासून कुस्तीला सुरुवात

खाशाब जाधव यांनी आपल्या वयाच्या 10व्या वर्षी कुस्तीला सुरुवात केली होती. एवढ्या लहान वयात ते वडिलांसोबत रोज सराव करत असे. खाशाबा जाधव यांना कुस्तीची चांगली जाण होती. ते त्यांच्या स्पर्धकाला उचलून अक्षरश: जमिनीवर फेकायचे. त्यांची हेड लॉकिंग स्टाइलही जबरदस्त होती.

असे म्हटले जाते की, त्यांचा कुशल दृष्टीकोन आणि उत्कृष्ट डावपेच यामुळे ते त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणले जाऊ लागले. जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या (जे एक कुस्तीपटू देखील होते) आणि इतर व्यावसायिक कुस्तीपटूंच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले आणि अनेक राज्य आणि राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.

बाळाच्या उपचारासाठी तिने ऑलिम्पिक पदकाचा केला लिलाव, शस्त्रक्रीयेसाठी उभे केले अडीच कोटी

मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे खाशाबा जाधव यांना हेलसिंकी ऑलिम्पिकमधील जबरदस्त कामगिरीनंतर आपली कुस्ती कारकीर्द पुढे सुरू ठेवता आली नाही. नंतर त्यांनी पोलीस दलात अधिकारी म्हणून काम केले.

1984 मध्ये त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार प्रदान केला. 2010 मध्ये दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी कुस्तीचे ठिकाणही त्यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT