पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमिरला IPL खेळता येणार? कसं?
Mohammad Amir : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याला ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले असून, आता तो 2026 च्या आयपीएल (IPL) हंगामात इंग्लंडचा खेळाडू म्हणून खेळण्यास पात्र ठरु शकतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमिरला IPL खेळता येणार? कसं?
मोहम्मद आमीर याला ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले
Mohammad Amir : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान डावखुरा गोलंदाज मोहम्मद आमिर याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मोहम्मद आमीर याने अखेर ब्रिटनचे (युनायटेड किंगडम) अधिकृत नागरिकत्व प्राप्त केले असून, यामुळे त्याच्यासाठी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे (IPL) दरवाजे अधिकृतपणे उघडले आहेत. त्यामुळे मोहम्मद आमिर आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा : Personal Finance: 'नो-कॉस्ट EMI' अजिबात नाही मोफत, खरेदीपूर्वी लक्षात ठेवा नाहीतर होईल मोठी गडबड
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या या 34 वर्षीय गोलंदाजाने पूर्वीच स्पष्ट केले होते की, त्याची पत्नी नर्जिस खान ही ब्रिटीश नागरिक असल्याने तिच्या माध्यमातून तो यूकेचा (UK) पासपोर्ट मिळवण्याच्या प्रक्रियेत होता. आता ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, आमिरने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टोरी रिपोस्ट करत या राष्ट्रीयत्वाच्या बदलावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आमिर आता आयपीएलसह जगातील इतर नामांकित फ्रँचायझी लीगमध्ये ब्रिटीश ओव्हरसीज खेळाडू म्हणून नोंदणी करण्यास पूर्णपणे पात्र ठरला आहे.
हेही वाचा : कोल्हापूर : अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागलं अन्...,भयानक प्रकार उघड
मोहम्मद आमिर याने यापूर्वीच पाकिस्तानमधील 'हारना मना है' या प्रसिद्ध चॅट शोमध्ये हजेरी लावली असताना याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यावेळी त्याने जाहीर केले होते की, जर त्याला ब्रिटनचा पासपोर्ट मिळाला, तर तो 2026 पासून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरेल आणि संधी मिळाल्यास या स्पर्धेत खेळण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. चॅट शो दरम्यान आमीरने म्हटले होते की, "पुढच्या वर्षापर्यंत मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होईल, आणि जर मला ती संधी मिळाली तर मी का खेळणार नाही? मी नक्कीच आयपीएलमध्ये खेळेन." पाकिस्तानसाठी 36 कसोटी, 61 एकदिवसीय (ODI) आणि 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला आमिर हा अद्यापही फ्रँचायझी क्रिकेटमधील सर्वात हाय-प्रोफाइल आणि घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. नवीन चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची आणि दबावाच्या परिस्थितीत उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता पाहता, जर तो ब्रिटीश नागरिक म्हणून लिलावात उतरला तर अनेक संघांसाठी तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर IPL मध्ये बंदी
वास्तविक पाहता, मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 2008 मध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, शोएब मलिक आणि सोहेल तन्वीर यांसारख्या अनेक पाकिस्तानी स्टार खेळाडूंनी आयपीएल सामने खेळले होते. मात्र, त्या पहिल्या हंगामानंतर आजतागायत एकही पाकिस्तानी खेळाडू या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळू शकलेला नाही. असे असतानाही, मोहम्मद आमिरला मिळालेल्या ब्रिटीश नागरिकत्वामुळे त्याला या बंदीमधून एक कायदेशीर पळवाट मिळाली असून, तो आता पाकिस्तानी नागरिक म्हणून नाही, तर एक इंग्लिश खेळाडू म्हणून आयपीएलच्या लिलावात आपले नाव नोंदवू शकतो, ज्यामुळे त्याचा लीगमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.









