क्रिकेटमध्ये पुन्हा फिक्सिंग? मोहम्मद सिराजला एका ड्रायव्हरचा संपर्क, दिली पैशाची लालच
Mohammed siraj approached for betting : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed siraj) मॅच फिक्सिंगसाठी व्ह़ॉट्सअॅपवर मेसेज आला होता. यावेळी एका व्यक्तीने सिराजला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून संघातली आतली माहिती मागिवली होती.
ADVERTISEMENT
Mohammed siraj approached for betting : देशभरात आयपीएलची धुम सुरु आहे. दररोज शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार सामने फॅन्सना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान फिक्सिंगची एक घटना समोर आली आहे.मोहम्मद सिराजने (Mohammed siraj) एका सामन्या दरम्यानचा फिक्सिंगचा खळबळजनक खुलासा केला आहे. एका सामन्या दरम्यान एका व्यक्तीने त्याच्याकडून संघातील खाजगी माहिती मागवली होती. सिराजच्या या खुलास्यानंतर क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (mohammed siraj approached by driver for cricket betting inside information before ipl 2023)
ADVERTISEMENT
व्ह़ॉट्सअॅपवर फिक्सिंगसाठी मेसेज
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed siraj) मॅच फिक्सिंगसाठी व्ह़ॉट्सअॅपवर मेसेज आला होता. यावेळी एका व्यक्तीने सिराजला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून संघातली आतली माहिती मागिवली होती. या बदल्यात सिराजला मोठी रक्कम देण्याचे आमीष देखील दाखवले गेले होते. या फिक्सिंगची माहिती सिराजने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आणि अॅटी करप्शन य़ुनिटला (ACU) दिली होती. या फिक्सिंगची माहिती मिळताच बीसीसीआय अॅक्शन मोडवर आली होती. बीसीसीआय़ने याचा तपास करून मालिकेपुर्वीच एका बस ड्रायव्हरला ताब्यात घेतले होते.
हे ही वाचा : WTC : भारताविरुद्धच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर! ‘या’ खेळाडूची 4 वर्षानंतर मैदानात वापसी
बस ड्रायव्हरला अटक
सिराजला (Mohammed siraj) संपर्क करणारा कोणी सट्टेबाज नव्हता तो हैदाबादचा ड्रायव्हर होता. हा ड्रायव्हर सामन्यावर सट्टा लावायचा. सट्टेबाजीत त्याने अनेक पैसै गमावले होते. त्यामुळे त्याने संघातली आतली माहिती मागवण्यासाठी सिराजशी संपर्क केला होता. सिराजने या घटनेनंतर बीसीसीआयला याची माहिती दिली होती, अशी माहिती एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 आणि 4 थ्या टेस्टपुर्वी ही घटना घडली होती. सिराजने माहिती दिल्यानंतर लगेचच कारवाई करण्यात आली. अॅटी करप्शन य़ुनिटने आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
हे वाचलं का?
दरम्यान आता आयपीएलमध्ये फिक्सिंगची प्रकरणे समोर आल्यानंतर बीसीसीआयची अँटी करप्शन टीम अलर्टवर असते. आयपीएलच्या प्रत्येक टीमसोबत आता अॅटी करप्शन य़ुनिटचा एक अधिकारी असतो. जो खेळाडूंसोबच हॉटेलमध्ये असतो. प्रत्येक खेळाडूंच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो. खेळाडूंची चौकशी करतो. जर एखादा खेळाडू सहकार्य करत नसेल तर त्याच्यावर कारवाई होते.
हे ही वाचा : चुकीला माफी नाही… कोहलीला दणका! मोठी कारवाई
बांग्लादेशचे कर्णधार शाकिब अल हसनला 2021 ला निलंबित करण्यात आले होते. कारण त्याने गेल्या सीझनमध्ये फिक्सिंगसाठी संपर्क करणाऱ्या व्यक्तींची माहिती दिली नव्हती.त्यानंतर शाकिब अल हसनवर कारवाई करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT