Mohsin Khan : वडील आयसीयूमध्ये अन् त्याने गाजवलं मैदान; मोहसीन का झाला भावूक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Lucknow Super Giants vs Mumbai Indians LSG fast bowler Mohsin Khan became emotional with the memory of his father.
Lucknow Super Giants vs Mumbai Indians LSG fast bowler Mohsin Khan became emotional with the memory of his father.
social share
google news

Mohsin Khan LSG, IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये अगदी तोंडाशी असलेला विजयाचा घास मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकात गमवावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) दिलेलं धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी शेवटच्या षटकात मुंबईला केवळ 11 धावांची गरज होती आणि तेच पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे 11 धावा का होऊ शकल्या नाही, याचाच विचार सध्या मुंबई इंडियन्स करत असेल. पण, मुंबईच्या विजयात सर्वात मोठा अडथळा ठरला लखनौचा एक गोलंदाज. हा गोलंदाज होता लखनौ सुपर जायंट्सचा (एलएसजी) मोहसिन खान!

शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 11 धावांची गरज होती. कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड खेळपट्टीवर होते. शेवटच्या षटकात टीम डेव्हिड सामना कसा फिरवू शकतो, हे आयपीएल चाहत्यांना वेगळं सांगायची गरज नाही. मात्र टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन यांनी मोहसीनसमोर सपशेल शरणागती पत्करली. त्यामुळे लखनौने हा सामना 5 धावांनी जिंकला. त्यामुळेच लखनौची आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत आहेत.

विजयानंतर मोहसीन खान झाला भावूक

शेवटचं आणि निर्णायक षटक टाकणाऱ्या मोहसीन खानने केलेली ही कामगिरी एलएसजीसाठी न विसरता येणारी आहे. त्याने 3 षटकात 26 धावा देऊन एक विकेट घेतली. मोहसीन खान एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. मोहसीन सामन्यानंतर अतिशय भावूक झाल्याचं बघायला मिळालं. मुंबईविरुद्धचा विजय त्याने वडिलांना समर्पित केला. 16 मे रोजी झालेल्या सामन्यापर्यंत मोहसीनचे वडील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> LSG vs MI : 6,0,4,4,6,4…लखनऊच्या मार्कस स्टॉईनिसकडून मुंबईच्या बॉलरची अक्षरश धुलाई

मोहसीन दाटलेल्या कंठाने म्हणाला, “माझे वडील आयसीयूमध्ये होते आणि मी त्यांच्यासाठी खेळत होतो. कालच (15 मे) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी टीव्हीवर सामना पाहिला असावा. त्यामुळे मी फक्त त्यांच्यासाठीच खेळत होतो. गेल्या 10 दिवसांपासून ते आयसीयूमध्ये होते. माझ्या कामगिरीवर ते खूश असतील.”

IPL 2022 मध्ये मोहसीन खानने केली स्फोट कामगिरी, पण जायबंदी झाला

मोहसीन खानसाठी आयपीएल 2022 चा हंगाम खूपच चांगला राहिला होता. त्याने 9 सामन्यात 5.97 च्या इकॉनॉमी रेटने 14 बळी घेतले. यानंतर त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. जवळपास वर्षभर तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळू शकला नाही. सामना संपल्यानंतर मोहसीन खान म्हणाला, “गेले 12 महिने माझ्यासाठी खूप कठीण गेले.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “धोनी RCB चा कर्णधार असता, तर तीन वेळा ट्रॉफी जिंकली असती”, वसीम अक्रम असं का म्हणाला?

मोहसीन पुढे म्हणाला, “मी जवळपास वर्षभरानंतर सामना खेळत होतो. मधेच मला दुखापत झाली, आज मी जेव्हा गोलंदाजी करत होतो, तेव्हा मी पूर्वीसारखीच गोलंदाजी करत असल्यासारखं वाटलं. मी माझ्या कामगिरीवर खूप खूश आहे.”

ADVERTISEMENT

mohsin khan : आयपीएल 2023 साठीही नव्हता फिट

एलएसजीकडून खेळत असलेला मोहसिन खान आयपीएलच्या 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फिट नव्हता. त्याचवेळी मुंबई विरुद्धचा सामना हा देखील त्याचा या आयपीएल मोसमातील दुसरा सामना होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने तीन षटकात 42 धावा देत एक बळी घेतला होता.

या सामन्यात मोहसीन थोडा महागडा ठरला होता. त्याला पहिल्या दोन षटकात 21 धावा मिळाल्या. पण, यादरम्यान त्याने नेहल वढेराची विकेट घेतली. अखेरच्या षटकात मोहसीनने यॉर्कर्स आणि स्लोअर बॉलिंग मिक्स केली. मोहसीनने शेवटच्या षटकात केवळ 5 धावा दिल्या, त्यामुळे लखनौचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT