‘माझ्या मुलीने त्यावेळी भारताचा झेंडा फडकवला होता,’ शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन रोमांचक सामने झाले. दोन्ही संघ पहिल्यांदा जेव्हा आमनेसामने आले तेव्हा हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळामुळे भारताने पाच विकेट्सने विजय मिळवला. दुसरीकडे, सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला.

ADVERTISEMENT

आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, त्याच्या लहान मुलीने 4 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारताचा झेंडा फडकावला होता. आफ्रिदीने समा टीव्हीला सांगितले की, त्याचे कुटुंबीय सामना पाहण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गेले होते. त्याला त्याच्या पत्नीने सांगितले होते की, सामना पाहण्यासाठी आलेले 90 टक्के चाहते हे भारतीय समर्थक होते.

शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘होय मला कळले की तिथे जास्त भारतीय चाहते आहेत. माझे कुटुंब तिथे बसले होते. मला व्हिडिओ पाठवले जात होते जे मी पाहत होतो. माझी पत्नी मला सांगत होती की इथे फक्त 10 टक्के पाकिस्तानी आहेत, बाकीचे 90 टक्के भारतीय आहेत. पाकिस्तानचा झेंडाही तिथे उपलब्ध नव्हता, त्यामुळे माझी धाकटी मुलगी भारताचा झेंडा फडकावत होती. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ट्विट करावे की नाही, असा प्रश्न पडला होता.

हे वाचलं का?

शाहिद आफ्रिदी अनेकदा सापडला आहे वादात

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या भारतविरोधी वक्तव्यामुळे चर्चेत असतो. पण त्याचा नवा दावा धक्कादायक आहे. काही महिन्यांपूर्वी शाहिद आफ्रिदीने भारताला पाकिस्तानचा शत्रू देश म्हटले होते. त्यानंतर आफ्रिदीने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासिन मलिकच्या समर्थनार्थ वादग्रस्त ट्विट केले होते.

ADVERTISEMENT

शाहिद आफ्रिदी त्याच्या वयामुळे वादात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार, आफ्रिदीचा जन्म 1 मार्च 1980 रोजी झाला, म्हणजेच त्याचे वय 42 वर्षे आहे. 2019 मध्ये, आफ्रिदीने 1996 मध्ये नैरोबी येथे श्रीलंकेविरुद्ध 37 चेंडूत विक्रमी शतक झळकावले तेव्हा तो 16 वर्षांचा नव्हता असे उघड केले.

ADVERTISEMENT

शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय कामगिरी

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने 27 कसोटी सामन्यांमध्ये 1716 धावा केल्या असून 48 विकेट घेतल्या आहेत. शाहिद आफ्रिदीच्या नावावर 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8064 धावा व्यतिरिक्त 395 बळी आहेत. स्टार अष्टपैलू खेळाडू असलेल्या शाहिद आफ्रिदीने 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले, त्यात 1416 धावा केल्या आणि 98 विकेट घेतल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT