Ranji Trophy 2025: अरेरे... रोहित, रहाणे, अय्यर सपशेल फेल, जम्मू-काश्मीरने मुंबईला चारली धूळ
Ranji Trophy 2025 Mum Vs J&K: रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाला जम्मू-काश्मीरच्या संघाकडून 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरसारखे खेळाडू हे सपशेल फेल ठरले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जम्मू-काश्मीरने मुंबईला केलं पराभूत

जम्मू-काश्मीरने मुंबईवर 5 गडी राखून मिळवला विजय

मुंबई संघातील दिग्गज फलंदाज ठरले अपयशी
मुंबई: देशातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत यंदा मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कारण या स्पर्धेत मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या संघाने मुंबईला मुंबईतच हरवत एक मोठा इतिहास रचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू संघात असतानाही मुंबईच्या संघाला अत्यंत मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. (ranji trophy 2025 jammu and kashmir created history by defeating mumbai shardul thakur century went in vain rohit sharma ajinkya rahane flopped)
या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईकडे रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरसारखे अनेक महान खेळाडू होते. पण तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, पारस डोग्राच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर संघाने जोरदार कामगिरी केली आणि ऐतिहासिक विजय मिळवला.
हे ही वाचा>> Champions Trophy 2025: टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव राहणार की नाही? ICC ने थेट सांगितलं...
जम्मू आणि काश्मीरसाठी युद्धवीर सिंगने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्याला 'सामनावीर' घोषित करण्यात आले. मुंबईच्या पहिल्या डावात युद्धवीरने 8.2 ओव्हर टाकले. ज्यामध्ये त्याने 31 धावा देऊन 4 बळी घेतले. यासोबतच त्याने दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात युद्धवीरने 15 ओव्हर टाकले आणि 64 धावा दिल्या. त्याने संघासाठी काही धावाही जोडल्या. पहिल्या डावात युद्धवीरने 20 मोलाच्या अशा धावा केल्या.
रोहित-रहाणे-अय्यरसह अनेक दिग्गज खेळाडू ठरले अपयशी
मुंबईचा संघ पहिल्या डावात 120 धावांवर ऑलआउट झाला. यादरम्यान, रोहित ३ धावा करून बाद झाला. यशस्वी जयस्वाल 4 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर कर्णधार रहाणे 12 धावा काढून बाद झाला आणि अय्यर 11 धावा काढून बाद झाला. पण यावेळी शार्दुल ठाकूरने 51 धावांचे योगदान दिले. तर दुसऱ्या डावात संघाने 290 धावा केल्या. या दरम्यान शार्दुलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 119 धावा केल्या. तर तनुश कोटियनने 62 धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही.
हे ही वाचा>> Glenn Maxwell: आरारारा खतरनाक! मॅक्सवेलने T-20 सामन्यात पाडला षटकारांचा पाऊस, रोहित शर्माचा 'तो' महाविक्रम मोडला
जम्मू-काश्मीरने मिळवला ऐतिहासिक विजय
जम्मू आणि काश्मीरसाठी हा ऐतिहासिक विजय आहे. त्यांनी गतविजेत्या मुंबईला पराभूत केले आहे. पहिल्या डावात संघाने 206 धावा केल्या होत्या. यादरम्यान शुभम खजुरियाने 53 धावा केल्या होत्या. अदीब मुश्ताकने 44 धावांचे योगदान दिले. यानंतर, दुसऱ्या डावात त्यांनी 5 विकेट गमावल्यानंतर 207 धावा केल्या आणि विजय मिळवला. जम्मू आणि काश्मीरकडून दुसऱ्या डावात मुश्ताकने नाबाद 32 धावा केल्या.