Champions Trophy 2025: टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव राहणार की नाही? ICC ने थेट सांगितलं...
Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांच्या जर्सीतून पाकिस्तानचं नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

19 फेब्रुवारी 2025 पासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा रंगणार थरार

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला खेळणार पहिला सामना

पाकिस्तानचं नाव काढून टाकण्याचा निर्णय?
Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांच्या जर्सीतून पाकिस्तानचं नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. परंतु, आसीसीने नुकतच या रिपोर्ट्सचं खंडन केलं आहे. आयसीसीने याबाबत खुलासा केला आहे. ए स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, आसीसीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की, सर्व संघांसाठी त्यांच्या किटवर अधिकृत टूर्नामेंट लोगो प्रदर्शित करणं अनिवार्य आहे. यामध्ये देशाच्या नावाचाही समावेश केला आहे. प्रत्येक संघाची जबाबदारी आहे की, त्यांनी त्यांच्या जर्सीवर टूर्नामेंटचा लोगो लावावा. सर्व संघांना या नियमाचं पालन करणं बंधनकारक आहे.
भारतीय मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं की, बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सीतून पाकिस्तानचं नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, लोगो योग्य पद्धतीत प्रदर्शित न करणाऱ्या संघावर कठोर कारवाई केली जाईल, असंही आयसीसीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या रिपोर्ट्सचं खंडन करत म्हटलं की, पीसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने भारतीय मीडियाशी या विषयी चर्चा केली नाही. पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात राजकीय मुद्द्यांवरून घमासान सुरु आहे. म्हणजेच भारतीय सरकारने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे आयसीसीने हायब्रिड मॉडेल स्विकारलं. त्यामुळे भारतीय संघ त्यांचे सामने दुबईत खेळणार आहे.
हे ही वाचा >> Saif Ali Khan : चाकू हल्ल्यातून सावरलेल्या सैफला पुन्हा एक धक्का, 15 हजार कोटींची प्रॉपर्टी जप्त होणार?
आयएएनएसच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, बीसीसीआयला आपल्या संघाच्या जर्सीवर पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख करायचा नाहीय. परंतु, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत भारतीय बोर्डाकडून कोणतीही माहिती न मिळाल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण भारतीय बोर्डाने आपल्या संघाला म्हणजेच टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. 19 फेब्रुवारी 2025 पासून चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. यावेळी पाकिस्तान आणि यूएई यांच्यात या टूर्नामेंटचं यजमानपद आहे. या टूर्नामेंटमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला पहिला सामना खेळणार आहे.