WPL 2023 : RCB चा सलग दुसरा पराभव; कर्णधार स्मृती मंधानाने कोणाला धरलं जबाबदार?
WPL 2023 : महिला आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सोमवार, 6 मार्च रोजी झालेल्या सामन्यात मुंबई संघाने बंगळुरूचा (Bangalore) 9 गडी राखून पराभव केला. हेली मॅथ्यूजने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यात 3 बळी घेण्यासोबतच त्याने 77 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. बंगळुरूचा या स्पर्धेतील हा […]
ADVERTISEMENT
WPL 2023 : महिला आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सोमवार, 6 मार्च रोजी झालेल्या सामन्यात मुंबई संघाने बंगळुरूचा (Bangalore) 9 गडी राखून पराभव केला. हेली मॅथ्यूजने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यात 3 बळी घेण्यासोबतच त्याने 77 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. बंगळुरूचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे. यानंतर संघाची कर्णधार स्मृती मंधाना (Smruti mandhana) खूपच निराश दिसली. (RCB’s second defeat in a row; Captain Smriti Mandhana held responsible?)
ADVERTISEMENT
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधाराच्या मते, संघाचे अनेक फलंदाज चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करू शकले नाहीत. ती म्हणाली, ‘आम्हाला चांगली धावसंख्या उभारायची होती, पण अपयशी ठरलो. हा पराभव स्वीकारावा लागेल. आपली चूक मान्य करून पुन्हा कमबॅक करावा लागेल. दोन-तीन फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी 20 धावांचा टप्पा ओलांडला पण त्याला मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकले नाही. ज्यामध्ये माझाही समावेश आहे. आमच्याकडे 6-7 बॉलिंगचे पर्याय आहेत पण जेव्हा फलंदाज धावा करत नाहीत तेव्हा आम्ही गोलंदाजांना जास्त काही सांगू शकत नाही,’ असं स्मृती मनधाना म्हणाली.
WPL Kiran Navgire: सोलापूरच्या पोरीनं बॅटवर लिहलं धोनीचं नाव, ठोकलं अर्धशतक
हे वाचलं का?
मॅचमध्ये काय घडलं?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोफी डिव्हाईनसह मनधानाने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४.२ षटकांत ३९ धावा जोडल्या. डेव्हाईनला सायकाने बाद केले. आणि 23 धावांची खेळी केली. यानंतर विकेट पडली आणि बंगळुरूचा निम्मा संघ 71 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कनिका आहुजाने रिचा घोषसोबत सहाव्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी करत संघाला सांभाळले. श्रेयंका पाटील आणि मेगन शुट यांनी छोट्या डावात संघाची धावसंख्या 155 पर्यंत पोहोचवली. पाटीलने 23 आणि शटने 20 धावा केल्या. मुंबईकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक 3 बळी घेतले.
WPL 2023 : मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरूच: RCB चा केला दारुण पराभव
ADVERTISEMENT
प्रत्युत्तरात मुंबईची सुरुवात चांगली झाली. यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. यास्तिका 23 धावा केल्यानंतर प्रीती बोसच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाली. यानंतर नताली स्कायव्हरने मॅथ्यूजसोबत हातमिळवणी केली आणि अतिशय आक्रमक खेळ दाखवला. त्यामुळे मुंबईने अवघ्या 14.2 षटकांत 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. मॅथ्यूज 77 आणि सिव्हरने 55 धावा करून नाबाद राहिले. मुंबईचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
ADVERTISEMENT
WPL : RCB ची महिला आयपीएलमध्येही वाईट दशा… लोटपोट हसवणारे मीम्स व्हायरल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT