IPL 2021 : ऋषभ पंतच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, नवीन सिझनमध्ये करणार दिल्लीचं नेतृत्व
आयपीएलच्या चौदाव्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा युवा खेळाडू ऋषभ पंतच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋषभ नवीन सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन याची घोषणा केली आहे. ? ANNOUNCEMENT ? Rishabh Pant will be our Captain for #IPL2021 ✨@ShreyasIyer15 has been ruled out of the upcoming season […]
ADVERTISEMENT

आयपीएलच्या चौदाव्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा युवा खेळाडू ऋषभ पंतच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋषभ नवीन सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन याची घोषणा केली आहे.
? ANNOUNCEMENT ?
Rishabh Pant will be our Captain for #IPL2021 ✨@ShreyasIyer15 has been ruled out of the upcoming season following his injury in the #INDvENG series and @RishabhPant17 will lead the team in his absence ?#YehHaiNayiDilli
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 30, 2021
इंग्लंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात फिल्डींग करत असताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. मेडीकल टेस्ट केल्यानंतर त्याच्या खांद्याला झालेली दुखापत ही गंभीर असल्याचं समोर आलं होतं. ज्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या सिरीजनंतर आयपीएलमधूनही माघार घ्यावी लागली होती. यानंतर दिल्लीची कॅप्टन्सी कोणाकडे जाणार याबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. अखेरीस कॅप्टन्सीची ही माळ पंतच्या गळ्यात पडली आहे.
IPL 2021: Soft Signal नाही, ९० मिनीटांमध्ये संपवायची इनिंग…BCCI कडून नवीन नियम जाहीर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून ऋषभ पंतच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत ऋषभने आपल्या इनिंगच्या जोरावर भारतीय संघाला महत्वाची टेस्ट मॅच जिंकवून दिली. यानंतर इंग्लंडविरुद्ध सिरीजमध्येही ऋषभने आपली चमक दाखवली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने ऋषभला कॅप्टन्सीची संधी दिली आहे.










