Rohit Sharma: ठरलं… भारताच्या टी-20 टीमचा कॅप्टन रोहित शर्माच, न्यूझीलंडविरुद्धच्या सीरीजसाठी संघही जाहीर

मुंबई तक

मुंबई: यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला हात हालवत मायदेशी परतावं लागलं ज्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघात महत्त्वाच्या बदलांना सुरुवात झाली आहे. या विश्वचषकाच्या आधीच विराटने टी-20 चं कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर या जागी मुंबईकर रोहित शर्माची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं होतं. अखेर यावर आज (9 नोव्हेंबर) शिक्कामोर्तब देखील झालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला हात हालवत मायदेशी परतावं लागलं ज्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघात महत्त्वाच्या बदलांना सुरुवात झाली आहे. या विश्वचषकाच्या आधीच विराटने टी-20 चं कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर या जागी मुंबईकर रोहित शर्माची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं होतं. अखेर यावर आज (9 नोव्हेंबर) शिक्कामोर्तब देखील झालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांसाठी आज निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्याचवेळी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे. तसंच या टी-20 सीरीजसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे.

पाहा न्यूझीलंडच्या टी-20 सीरीजसाठी भारतीय संघात कोणाकोणाला देण्यात आलंय स्थान.

भारतीय संघ (T20I) : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेट-कीपर), इशान किशन (विकेट-कीपर), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

यावेळी न्यूझीलंडचा संघ हा भारताच्या दौऱ्यावर येणार असून 17 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरवात होणार आहे. अशावेळी कर्णधार रोहित शर्मासमोर प्रचंड मोठं आव्हान असणार आहे. आधीच भारतीय संघाला टी-20 वर्ल्डकपमधून ज्या पद्धतीने बाहेर पडावं लागलं त्याने भारतीय क्रिकेट चाहते हे प्रचंड हिरमुसले आहेत. अशावेळी भारतीय संघाला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्याचं आव्हान रोहित समोर असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp