Rohit Sharma: रोहितची धोनी, तेंडुलकरच्या क्लबमध्ये एन्ट्री, ठरला 6वा भारतीय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rohit sharma international runs : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होत असून, मालिकेतील चौथा सामना अहमदाबादमधील (ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (narendra modi stadium) खेळला जात आहे. याच सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 21 धावा करतात विक्रम केला. या विक्रमाबरोबरच रोहित शर्मा एमएस धोनी (MS Dhoni) आणि सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यांच्या क्लबमध्ये सामील झाला. असा विक्रम करणारा रोहित शर्मा हा 6 भारतीय फलंदाज ठरला आहे. (rohit sharma international runs in all format)

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या चौथा कसोटी सामना सुरू आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा वर्चस्व बघायला मिळालं. ऑस्ट्रेलियाने 480 धावांचा केल्या. त्यानंतर टीम इंडिया आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरली.

सलामीवर आणि कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या दिवसांचा खेळ संपला त्यावेळी 17 धावांवर नाबाद होता. तिसऱ्या दिवसांच्या सुरुवातीला रोहित शर्माने 21वी धाव घेतली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम धावसंख्या गाठली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ind vs Aus : क्रिकेट इतिहासातला सर्वांत वाईट DRS,रोहित होतोय ट्रोल

रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17000 धावा पूर्ण

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17000 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. या टप्प्यावर पोहोचणारा रोहित शर्मा 6वा भारतीय फलंदाज ठरला आहे.

ADVERTISEMENT

टीम इंडियासाठी शुभमन गिल आणि रोहित शर्माने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सावध सुरूवात करत बिनबाद 36 धावा केल्या होत्या. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही फंलदाज सेट झाले होते. शुभमन गिलच्या साथीने रोहित शर्माने धावसंख्या वाढवण्यावर भर दिला.

ADVERTISEMENT

Ind vs Aus : विराट कोहली, चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचं कसं वाढवलं टेन्शन?

यावेळी रोहित शर्माने 21वी धाव घेतली आणि 17000 धावांचा टप्पा पार केला. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात मिळून (एकदिवसीय, कसोटी आणि टी20) 17000 हजार धावा पूर्ण केल्या.

अहमदाबाद कसोटी सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माच्या 16,979 धावा होत्या. 17000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त 21 धावांची गरज होती. मात्र, हा विक्रम केल्यानंतर रोहित फार काळ खेळपट्टीवर तग धरून शकला नाही आणि 58 चेंडूत तीन चौकार आणि 1 षटकारांसह 35 धावा करून तो तंबूत परतला. आता रोहित शर्माच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (एकदिवसीय, कसोटी आणि टी20) 17,014 धावा झाल्या आहेत.

Ind Vs Aus: ‘भारतात कॅप्टन्सी करणं…’, स्टीव्ह स्मिथ मॅच जिंकल्यावर काय बोलला?

रोहित शर्मा एमएस धोनीला टाकणार मागे

17 हजार धावा करताच रोहित शर्मा सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आता रोहित शर्माकडे एमएस धोनीला मागे टाकण्याची संधी आहे. रोहित शर्माला अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने 79 धावा केल्या, तर तो धोनींचा विक्रम मोडून पुढे जाऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (एकदिवसीय, कसोटी आणि टी20) 17 हजारांपेक्षा अधिक धावा करणारे भारतीय फलंदाज कोण?

सचिन तेंडुलकर -34 हजार 357 धावा

विराट कोहली – 25 हजार 47 धावा

राहुल द्रविड – 24 हजार 64 धावा

सौरव गांगुली – 18 हजार 433 धावा

एमएस धोनी -17 हजार 92 धावा

रोहित शर्मा -17 हजार 14 धावा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT