IPL 2021 : विराट कोहलीचं टेन्शन वाढलं, RCB च्या स्टार बॅट्समनला कोरोनाची लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. परंतू या मॅचआधीच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर मोठं टेन्शन निर्माण झालं आहे. गेल्या हंगामात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलेला स्टार बॅट्समन देवदत पडीकलला कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी देवदतच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला, ज्यानंतर तो आपल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाला आहे.

ADVERTISEMENT

स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच देवदतला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो RCB च्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली होती. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणालाही कोरोनाची लागण झाली होती…परंतू यानंतर नितीशने स्वतःला क्वारंटाइन केल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आणि त्याला सरावाची परवानगी मिळाली.

IPL वर टांगती तलवार? वानखेडे मैदानावरील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

हे वाचलं का?

आयपीएलचा तेरावा हंगाम खेळत असताना RCB च्या संघाकडून देवदत पडीकल चमकला होता. १५ सामन्यांमध्ये देवदतने ३१.५३ च्या सरासरीने ४७३ रन्स केल्या होत्या. याव्यतिरीक्त नवीन वर्षात पडीकल सय्यद मुश्ताक अली, विजय हजारे ट्रॉफी यासारख्या स्पर्धांमध्ये खेळतानाही चमकला होता. त्यामुळे पडीकलच्या अनुपस्थितीत विराट कोहली ओपनिंगला कोणाला संधी देतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT