टीम इंडिया पुन्हा एक धक्का! ऋतुराज गायकवाड श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
भारत-श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या आधीच भारताला मोठा झटका बसला आहे. जायबंदी झाल्याने सलामीवीर ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या ऐवजी आता मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आलं आहे. ऋतुराज आधी गोलंदाज दीपक चहरने जायबंदी झाल्यानं मालिकेतून माघार घेतली. सध्या श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आलेला असून, तीन टी20 तर दोन कसोटी […]
ADVERTISEMENT

भारत-श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या आधीच भारताला मोठा झटका बसला आहे. जायबंदी झाल्याने सलामीवीर ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या ऐवजी आता मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आलं आहे. ऋतुराज आधी गोलंदाज दीपक चहरने जायबंदी झाल्यानं मालिकेतून माघार घेतली.
सध्या श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आलेला असून, तीन टी20 तर दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला टी20 सामना झाला असून, आज दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी ऋतुराज गायकवाड संघातून बाहेर झाला आहे.
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऋतुराज गायकवाडला खेळवण्यात आलं नव्हतं. बीसीसीआयने याचं कारण सांगताना म्हटलं होतं की ऋतुराज गायकवाडने त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात त्रास होत असल्याचं सांगितलं होतं. याचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ शकतो, असं बीसीसीआयने म्हटलं होतं. त्यामुळेच ऋतुराज पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम ऋतुराजच्या तपासण्या करत आहे.
ऋतुराजच्या ऐवजी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे संघात पटकन दाखल होण्यास मयांक अग्रवालकडून होकार मिळाला. त्यामुळे मयांकला धर्मशाला येथे पाठवण्यात आलं आहे.
Deepak Chahar : श्रीलंका मालिकेआधीच टीम इंडियाला झटका; दीपक चहर संघातून बाहेर
टी20 मालिकेनंतर भारत-श्रीलंकेत कसोटी मालिका होणार आहे. मालिकेतील दोन्ही सामने धर्माशाला येथेच होणार आहेत. कसोटी मालिकेसाठीचा भारतीय संघ सध्या चंदीगड येथे क्वारंटाईन आहे. मयांकही या संघात आता सहभागी झाला आहे.
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारताकडून 3 टी20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 13 च्या सरासरीने 39 धावा बनवल्या आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 21 आहे. ऋतुराज गायकवाडला आता एकदिवसीय आणि कसोटीतील पर्दापणाची प्रतिक्षा आहे.