सचिन तेंडुलकर रमला जुन्या आठवणीत, शिवाजी पार्कच्या BEST बसमध्ये खास फोटोसेशन
आपल्या सदाबहार खेळाने जगभरात कोट्यवधी चाहते निर्माण करणारा सचिन तेंडुलकर हे वेगळंच रसायन आहे. आजही तुम्हाला सचिन तेंडुलकरचे चाहते प्रत्येक गल्लीत सापडतील. शिवाजी पार्कच्या मैदानात सुरु झालेला सचिनचा क्रिकेट प्रवास जगातील प्रत्येक महत्वाच्या मैदानांची सफर करुन मुंबईच्या वानखेडे मैदानात येऊन थांबला. सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर सोशल मीडियावरही सक्रीय असतो. आज सचिन आपल्या बालपणाच्या आठवणीत रमलेला पहायला […]
ADVERTISEMENT
आपल्या सदाबहार खेळाने जगभरात कोट्यवधी चाहते निर्माण करणारा सचिन तेंडुलकर हे वेगळंच रसायन आहे. आजही तुम्हाला सचिन तेंडुलकरचे चाहते प्रत्येक गल्लीत सापडतील. शिवाजी पार्कच्या मैदानात सुरु झालेला सचिनचा क्रिकेट प्रवास जगातील प्रत्येक महत्वाच्या मैदानांची सफर करुन मुंबईच्या वानखेडे मैदानात येऊन थांबला. सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतर सोशल मीडियावरही सक्रीय असतो. आज सचिन आपल्या बालपणाच्या आठवणीत रमलेला पहायला मिळाला.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सचिनने शिवाजी पार्कला जाणाऱ्या BEST बसमध्ये फोटोसेशन केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो पोस्ट करताना सचिनने Rewind to Childhood #throwback अशी कॅप्शन दिली आहे. त्याच्या या फोटोसेशनला चाहत्यांनी भरभरुन पसंती दर्शवली आहे.
शिवाजी पार्क आणि सचिनचं खास नातं आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या सचिनला क्रिकेटचा सराव करता यावा यासाठी त्याला लहानपणी शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांकडे ठेवण्यात आलं होतं. शिवाजी पार्कच्या मैदानावर आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सचिनने क्रिकेटचे धडे गिरवले,
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT