sania Mirza : टेनिसपटू सानिया मिर्झा होणार निवृत्त; पराभवानंतर केली घोषणा
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यानच सानिया मिर्झाने ही घोषणा केली. २०२२ हा शेवटचा हंगाम असेल, असं म्हणत सानियाने खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी झालेल्या सानिया मिर्झाला बुधवारी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सानियाने थेट आपल्या निवृत्तीची घोषणा केली. पराभवानंतर बोलताना सानिया […]
ADVERTISEMENT

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यानच सानिया मिर्झाने ही घोषणा केली. २०२२ हा शेवटचा हंगाम असेल, असं म्हणत सानियाने खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी झालेल्या सानिया मिर्झाला बुधवारी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सानियाने थेट आपल्या निवृत्तीची घोषणा केली. पराभवानंतर बोलताना सानिया मिर्झा म्हणाली, हा आपला अखेरचा हंगाम असेल, मी प्रत्येक आठवड्याला पुढची तयारी करत आहे. पूर्ण हंगाम खेळू शकेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही,” असं सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा करताना म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार युक्रेनची नादिया किचनोक यांना पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरं जावं लागलं. स्लोव्हेनियाच्या तमारा झिदानसेक आणि काजा जुवान या जोडीने त्यांचा 6-3 6-7(2) 2-6 असा पराभव केला. दरम्यान सानिया मिर्झा आता या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसह सहभागी होणार आहे.
सामन्यानंतर सानिया मिर्झा म्हणाली, ‘मी चांगला खेळ करू शकते, असं मला वाटतं; पण आता शरीर पूर्वीसारखं साथ देत नाही.’ सानिया मिर्झा २००३ पासून आंतरराष्ट्रीय टेनिस सामने खेळत असून, तब्बल दोन दशकानंतर टेनिटमधून संन्यास घेणार आहे.