Shakib Al Hasan : बांग्लादेशच्या कर्णधारावर हत्येचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

shakib al hasan murder case has been filed bangladesh cricket board ban vs pak rawalpindi cricket stadium
शाकिबवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शाकिब अल हसनच्या अडचणी वाढणार

point

शाकिब अल हसनवर हत्येचा गुन्हा

point

शाकिबसह 156 जण या प्रकरणात आरोपी

Shakib Al Hasan  : बांग्लादेश क्रिकेट (Bangladesh Team) संघाचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण शाकिबवर (Shakib Al Hasan) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद रुबेल नावाच्या व्यक्तीचा ढाका येथे निदर्शनादरम्यान मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी शाकिबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाकिबसह 156 जण या प्रकरणात आरोपी आहेत. या घटनेने शाकिबच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (shakib al hasan murder case has been filed bangladesh cricket board ban vs pak rawalpindi cricket stadium) 

ADVERTISEMENT

बांगलादेशी न्यूज वेबसाईट ढाका ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, मृत मोहम्मद रुबेल याचे वडील रफीकुल इस्लाम यांनी ढाका येथील अडबोर पोलीस स्टेशनमध्ये शाकिब विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाकिब अल हसन सह बांग्लादेशी अभिनेता फिरदौस अहमद याच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शाकिब हा या प्रकरणातील 28वा आरोपी आहे तर फिरदौस हा 55वा आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना, ओबेदुल कादर आणि अन्य 154 जणांचा समावेश आहे. तसेच या घटनेत 400-500 अज्ञात लोकांनाही आरोपी करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Maharashtra Bandh: उद्धव ठाकरे उद्या स्वत: चौकात जाऊन बसणार, ठाकरेंची एक घोषणा अन्...

नेमकं प्रकरण काय? 

मोहम्मद रुबेल व्यवसायाने कपडा व्यापारी होता. 5 ऑगस्ट रोजी अडाबोर परिसरात झालेल्या शांतता आंदोलनात रुबेलने भाग घेतला होता. या आंदोलना दरम्यान शेख हसीना आणि इतरांकडून आदेश मिळताच लोकांनी आंदोलकांवर गोळीबार करून हल्ला चढवला होता.  या घटनेत रुबेलच्या छातीत दोन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रुबेल याचे वडील रफीकुल इस्लाम यांनी ढाका येथील अडबोर पोलीस स्टेशनमध्ये शाकिब विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाकिबसह या प्रकरणात इतर आरोपींमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना, ओबेदुल कादर आणि अन्य 154 जणांचा समावेश आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान रावळपिंडीत पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यात शाकिब बांगलादेशच्या संघाचा भाग असणार आहे. मात्र, शाकिबला या हत्याप्रकरणात कशामुळे आरोपी करण्यात आले? हे समजू शकलेले नाही. चार्जशीटनुसार, शाकिबला आरोपी नंबर 28 बनवण्यात आल्याची माहिती आहे. 

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष झालेल्या फारुख अहमद यांनी शाकिबला इशारा दिलाय.  बांगलादेशमध्ये संघाच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी न झाल्यास भवितव्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे म्हटले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी शाकिबने तयारी शिबिरात भाग घेतला नव्हता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maharashtra Bandh : 'उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घ्या', पवारांनी अचानक का घेतला असा निर्णय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT