Virat Kohli: शोएब अख्तरचं मोठं भाकित, म्हणाला, ‘विराट 110 शतक करणार’

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Shoaib akhtar-virat kohli News: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठं भाकित केलं आहे. शोएब अख्तरला असं मत आहे की, विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक शतक झळकवेल. शोएब अख्तर म्हणाला की, तो ज्या प्रकारचा खेळाडू आहे, त्यावरून असं वाटतंय की, तो 110 शतकं करेल.

ADVERTISEMENT

शोएब अख्तरने दोहा येथे लिजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्स स्पोटर्स तकशी बोलताना हे भाकित केलं आहे. कोहलीने अलिकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत शतक झळकावलं. हे त्याचं आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 75 वे शतक होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं सचिन तेंडुलकरने (100 शतके) झळकावली असून, दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे.

Virat Kohli : सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहली तोडू शकतो का?

हे वाचलं का?

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला, “विराट कोहलीने आता टी20 क्रिकेट सोडून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावं. सल्ला द्यायला मी कोण आहे, विराट खूपच भारी क्रिकेटपटू आहे, पण माझ्या मते कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष द्यावं. टी20 क्रिकेटमध्ये खूप शक्ती खर्च होते. पण तो खूप उत्साही खेळाडू आहे. त्याला त्या वातावरणात राहायची इच्छा आहे, पण त्याला त्यांची शक्ती वाचवावी लागेल.”

“विराट कोहली 40 व्या वर्षापर्यंत खेळू शकतो”

शोएब अख्तर असं म्हणाला की, “तो अजूनही सहा-आठ वर्ष क्रिकेट खेळू शकतो. त्यात तो 50 कसोटी सामने खेळू शकतो. त्यात 25 ते 35 शतके करण्यात काही अडचण येणार नाही. त्याला अडचण येईल ती मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची. शारीरिकदृष्ट्याही हे अवघड असेल. तो मजबूत आहे आणि पंजाबी मुलगा आहे. त्याचे विचार अजूनही स्वतंत्र आहेत. आशा आहे की, तो 100 आंतरराष्ट्रीय शतकांपेक्षा पुढे जाईल.”

ADVERTISEMENT

‘विराट’ खेळीच्या बळावर ‘कोहली’ने सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

ADVERTISEMENT

शोएब अख्तरचं असं मत आहे की, कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यानंतर प्रेक्षक स्टेडियममध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढतो. मलाही प्रेक्षकांसमोर आणि कॅमेऱ्यासमोर खेळायला खूप मजा येते. असंच कोहलीबाबत आहे. प्रेक्षकांना बघून कोहलीचाही उत्साह वाढतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT