Sikandar Shaikh: सिंकदरनं दिलेलं ‘हे’ उत्तर तुमचंही मन जिंकून घेईल!
दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर Sikandar Shaikh Exclusive interview Mumbai Tak: कोल्हापूर: महाराष्ट्र केसरी 2023 (Maharashtra Kesari) ची गदा ही पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) हाच पटकवणार असी चर्चा अवघ्या महाराष्ट्रात होती. कारण आजवर अनेक बड्या-बड्या मल्लांना आस्मान दाखवणारा हा ढाण्या वाघ आहेच तेवढ्या ताकदीचा. पण उपांत्य फेरीत एक अशी घटना घडली की सिकंदरसह अवघ्या महाराष्ट्रालाही धक्का […]
ADVERTISEMENT
दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
Sikandar Shaikh Exclusive interview Mumbai Tak: कोल्हापूर: महाराष्ट्र केसरी 2023 (Maharashtra Kesari) ची गदा ही पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) हाच पटकवणार असी चर्चा अवघ्या महाराष्ट्रात होती. कारण आजवर अनेक बड्या-बड्या मल्लांना आस्मान दाखवणारा हा ढाण्या वाघ आहेच तेवढ्या ताकदीचा. पण उपांत्य फेरीत एक अशी घटना घडली की सिकंदरसह अवघ्या महाराष्ट्रालाही धक्का बसला. अगदी शेवटच्या क्षणी पंचानी प्रतिस्पर्धी मल्लाला 4 गुण दिल्याने सिंकदरचा पराभव झाला. यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून या निर्णयावर प्रचंड टीका केली जात आहे. याचबाबत स्वत: सिकंदर शेखने मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (sikandar shaikh answer will win your heart too this is called a real player exclusive interview with mumbai tak )
यावेळी दिलेल्या एका उत्तराने सिंकदरने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं आहे. खरं तर एवढ्या मोठ्या स्पर्धेतील पराभवानंतर अनेक खेळाडू हे खचून जातात. त्यातही वादग्रस्त निकाल असेल तर खेळाडू सगळ्याचं खापर हा स्पर्धेवर फोडतो. पण सिंकदर मात्र, तसं अजिबात करत नाही.
हे वाचलं का?
मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत सिंकदर अगदी सहजपणे म्हणाला की, ‘अन्याय तर झाला.. हे सगळ्या भारताला दिसतं आहे. पण आता तीच गोष्ट धरुन बसलो तर ते योग्य होणार नाही. जे झालं ते मागे सोडा आणि पुढचं बघा.’
वाचा सिकंदर शेखची संपूर्ण मुलाखत:
प्रश्न: सिकंदर त्यादिवशी सामन्यात नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
सिकंदर शेख: मॅचमध्ये काय झालं ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यावर फार काही बोलणार नाही. सर्व लोकांना माहिती आहे की, नेमकं काय झालं आहे ते. त्यामुळे त्यावर सतत बोलणं देखील मला बरोबर वाटत नाही. त्यात आपण आता काही करुही शकत नाही. त्यामुळे मी विषय सोडून दिला आहे.
ADVERTISEMENT
‘महाराष्ट्र केसरी’त रंगली दोस्तांमध्ये कुस्ती! सिकंदर शेखने माऊली जमदाडेला दाखवलं अस्मान
प्रश्न: जो सामना चालू होता त्यात जो डाव होता त्या डावात साधारण जे पॉईंट दिले गेले त्या पॉईंट्समुळे अन्याय झाला?
सिकंदर शेख: अन्याय तर झाला.. हे सगळ्या भारताला दिसतं आहे. पण आता तीच गोष्ट धरुन बसलो तर ते योग्य होणार नाही. आता जे झालं ते झालं. माझी एक सवय आहे की, जे झालं ते मागे सोडा आणि पुढचं बघा.
प्रश्न: सामन्याच्या इथे जे कॅमेरे होते त्यांनी जे दाखवलं त्यामुळे तुझ्यावर अन्याय झाला का?
सिकंदर शेख: व्हिडीओ दाखवताना फ्रंट साइडने दाखवला. पण तिथे माती उडली होती. त्यात काहीही दिसलेलं नाही. जो बॅकसाइडचा कॅमेरा दाखवा असं आम्ही म्हटलं तेव्हा आम्हाला तो अँगल दाखवलेला नाही. आमचा कोच जेव्हा तिथे पळत गेला आणि म्हणाला की, चार पॉईंट नाहीत. तर तिथून आमच्या कोचलाच बाहेर काढण्यात आलं.
Sikandar Shaikh : पाच क्लिकमध्ये समजून घ्या सिकंदर शेखचा नेमका वाद
प्रश्न: तुमचं स्वप्न यंदाचा पूर्ण होऊ शकलं नाही. पण तुमचं स्वप्न कसं पूर्ण होईल?
सिकंदर शेख: मी आणखी प्रचंड प्रॅक्टिस करेन आणि गदा पटकावेनच..
प्रश्न: जो डाव पडला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?
सिकंदरचे प्रशिक्षक: सिकंदरसोबत मी कोच म्हणून गेलो होतो. जेव्हा दुसऱ्या राऊंडमध्ये कुस्ती सुरू होती तेव्हा त्याने टांग मारली. या डावावर दोन पॉईंट असतात. पण पंचांनी 4 पॉईंट दिले. तेव्हा आम्ही तिथं चँलेज केलं. तेव्हा पंच आम्हाला सांगायला लागले की, तुम्ही बसा आम्हाला शिकवू नका. माझ्यावर दबाव टाकला चार-पाच जणांनी.. ते म्हणाले तुम्ही खाली बसा नाहीतर तुम्हाला बाद करुन टाकू.
तेव्हा कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजभूषण देखील उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की, या डावाची निष्पक्ष चौकशी केली जावी आणि सांगावं की, दोन पॉईंट आहेत की चार पॉईंट. तेव्हा मी म्हटलं की, आम्हाला बॅकसाइडचा व्हिडीओ दाखवा. पण त्यांनी तो न दाखवता फ्रंट कॅमेरा व्हिडीओ पाहून चार पॉईंट देऊन टाकले. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत चिटींग केली आहे.
प्रश्न: यापुढे कुस्तीच्या फडात तुमची रणनिती कशी असेल?
सिकंदरचे प्रशिक्षक: यापुढे आम्ही आणखी जोमाने प्रयत्न करू. यावेळी देखील सिकंदरने बरीच मेहनत केली होती. पण आम्हाला चिटिंग करुन बाहेर काढण्यात आलं. नाही तर यंदाचा महाराष्ट्र केसरी हा सिकंदर शेख हाच असता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT