Ind vs Pak : टीम इंडियाचा ‘तो’ पण आणि पाकिस्तानी संघाची पावलं मुंबईत पडलीच नाहीत

मुंबई तक

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधली लढत किती रंगतदार होते हे सर्वांना माहिती आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये आता बाय-लिट्रल सिरीज खेळवल्या जात नाहीत. आयसीसीच्या स्पर्धांव्यतिरीक्त हे दोन संघ समोरासमोर येत नाहीत. २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान टी-२० विश्वचषकाच्या निमीत्ताने समोरासमोर येतील. यानिमीत्ताने आज आपण एक असा किस्सा जाणून घेणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधली लढत किती रंगतदार होते हे सर्वांना माहिती आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये आता बाय-लिट्रल सिरीज खेळवल्या जात नाहीत. आयसीसीच्या स्पर्धांव्यतिरीक्त हे दोन संघ समोरासमोर येत नाहीत. २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान टी-२० विश्वचषकाच्या निमीत्ताने समोरासमोर येतील.

यानिमीत्ताने आज आपण एक असा किस्सा जाणून घेणार आहोत की जिथे टीम इंडियाने ठरवून काहीही झालं तरीही पाकिस्तानला जिंकू द्यायचं नाही असा पण केला आणि सरतेशेवटी तो खरा करुन दाखवला.

T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव

ही गोष्ट आहे २०११ च्या वन-डे विश्वचषकाची. भारतीय संघासाठी ही स्पर्धा महत्वाची होती. २८ वर्षांनंतर भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्याची संधी आली होती….आणि सर्वांना ज्याची अपेक्षा होती तेच झालं. अंतिम फेरीत प्रवेश करण्याआधी भारतासमोर आव्हान आलं ते पाकिस्तानचं. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला सामना म्हटला की दोन्ही संघांवर तेवढचं टेन्शन असतं. परंतू त्यावेळी भारतीय संघाला पाकिस्तानला हरवणं खूप महत्वाचं होतं.