जय शहांच्या डोक्यात कल्पना आली आणि…जाणून घ्या T-20 World Cup साठी MS Dhoni कसा बनला संघाचा मेंटॉर?

मुंबई तक

युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी संघाची घोषणा केली. संघाची घोषणा करताना जय शहा यांनी महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार असल्याचं सांगितलं आणि सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी संघाची घोषणा केली. संघाची घोषणा करताना जय शहा यांनी महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार असल्याचं सांगितलं आणि सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर धोनीची टीम इंडियाशी निगडीत ही पहिलीच कामगिरी असणार आहे. धोनीला मेंटॉर म्हणून नेमण्यात सचिव जय शहा यांनी मोलाची भूमिका बजावल्याचं कळतंय.

‘टीमचा चाणक्य ड्रेसिंग रुममध्ये’! T-20 World Cup साठी धोनी संघाचा मेंटॉर, सोशल मीडियावर फॅन्स आनंदात

ज्यावेळी धोनीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेळी त्याने यात आपला रस दाखवला. टी-२० वर्ल्डकपसारख्या महत्वाच्या स्पर्धेसाठी धोनीने ही जबाबदारी स्विकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल बीसीसीआय त्याचं आभारी असल्याचंही जय शहा म्हणाले. परंतू धोनीची ही नेमणूक फक्त एका वर्षभरासाठी करण्यात आल्याचंही जय शहा यांनी स्पष्ट केलं.