T20 WC, Ind Vs NZ: सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताचं आव्हान धोक्यात

मुंबई तक

सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध सलामीचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडनेही भारतावर ८ विकेटने मात करत आपलं आव्हान कायम राखलं आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १११ धावांचं आव्हान न्यूझीलंडने सहज पूर्ण करुन दाखवलं. या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमधलं स्थान आता धोक्यात आलं आहे. न्यूझीलंडने भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर भारतीय चाहत्यांची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध सलामीचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडनेही भारतावर ८ विकेटने मात करत आपलं आव्हान कायम राखलं आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १११ धावांचं आव्हान न्यूझीलंडने सहज पूर्ण करुन दाखवलं. या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमधलं स्थान आता धोक्यात आलं आहे.

न्यूझीलंडने भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर भारतीय चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. मार्टीन गप्टील आणि डॅरेल मिचेल यांनी सावध सुरुवात करुन दिली. परंतू जसप्रीत बुमराहने मार्टीन गप्टीलला आऊट करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर डॅरेल मिचेल आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी महत्वाची पार्टनरशीप करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढून टाकली. बुमराहने मिचेलला आऊट करत आणखी एक विकेट घेतली. परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. यानंतर विल्यमसन आणि कॉनवे यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धचा सामना गमवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी करेल अशी सर्वांनाच आशा आहे. पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा निराशाच केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमवल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं. पण यावेळी पुन्हा एकदा टीम इंडियाची खराब सुरुवात झाली.

दरम्यान, या मोठ्या सामन्यासाठी टीम इंडियाने दोन बदल केले. पाकिस्तान सोबतचा सामना गमवल्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेत काहीसा बॅफूटवर गेला.

हे वाचलं का?

    follow whatsapp