IND vs BAN: भारताच्या फलंदाजांचा धमाका! 147 वर्षात कोणत्याच संघाला जमलं नाही, पाकिस्तानचाही विक्रम मोडला

मुंबई तक

ADVERTISEMENT

India Breaks Pakistan Record
Team India New Record In Test Cricket
social share
google news

बातम्या हायलाइट

point

टीम इंडियाच्या फलंदाजांनी कानपूरच्या मैदानात पाडला धावांचा पाऊस

point

पाकिस्तानचा 'तो' विक्रम मोडला

point

भारताच्या या फलंदाजांनी केली चमकदार कामगिरी

Ind vs Ban 2nd Test : बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माची पलटण  कमाल करत आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. कानपूरमध्ये सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात बांगलादेशचा डाव 233 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या रणनीतीने ग्रीनपार्क स्टेडियममध्ये धमाका केला.

भारताचा सलामीचा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालने  (72) कर्णधार रोहित शर्मासोबत सुरुवातीच्या 3.5 षटकांमध्ये 55 धावा करून एक नवीन विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर विराट कोहली (47) आणि के एल राहुलने धावांचा पाऊस पाडल्याने भारतीय संघानने ऐतिहासिक कामगिरी केली. कसोटीच्या इतिहासात 147 वर्षात अशी कामगिरी कोणत्याही संघाला करता आली नाही.

हे ही वाचा >> Optical Illusion Test: बाई की पुरुष? फोटोत सर्वात आधी काय दिसलं? नीट उत्तर सांगा

ही' आहे भारतीय संघाची ताकद

भारतीय फलंदाजांनी बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात धमाका केला. भारताने कसोटी सामन्याच्या एका इनिंगमध्ये सर्वात वेगवान 250 धावा करण्याचा कारनामा केला. बेजबॉल शैलीत फलंदाजी करणाऱ्या इंग्लिश टीमलाही अशी चमकदार कामगिरी करता आली नाही. याचसोबत भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने वर्ष 2022 मध्ये रावलपिंडीत इंग्लंड विरुद्ध 33.6 षटकात असा कारनामा केला होता. तर भारताने 30.3 षटकातच 250 धावा करून पाकिस्तानचा विक्रम मोडला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रोहितने घेतला भन्नाट झेल

लिटनने सिराजच्या चेंडूवर स्टेप आऊट करून इनफिल्ड क्लियर करण्याचा प्रयत्न केला, पण शॉर्ट ऑफ फुलर चेंडूला मिडऑफ वरून मारण्याच्या प्रयत्नात लिटन झेलबाद झाला. रोहितने हवेत उडी घेत एका हातात झेल घेऊन लिटनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लिटनचा झेल घेतल्यानंतर रोहितही काही वेळ थक्कच झाल्याचं मैदानात पाहायला मिळालं.

हे ही वाचा >> Couple Viral Video: नवरीच्या बोटात अंगठी जात नव्हती! पंडितने केलं असं काही...नवरा कोमात, पाहुणे जोमात

    follow whatsapp

    ADVERTISEMENT