Tokyo Olympics 2020 : भारताला मोठा धक्का, Bajrang Puniya सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्वप्नांना आणखी एक सुरुंग लागला आहे. भरवशाची कुस्तीपटू विनेश फोगाटचं आव्हान संपुष्टात आल्यावनंतर ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाचं आव्हानही संपुष्टात आलंय. उपांत्य फेरीत बजरंगवर अझरबैजानच्या हाजी अलीयेवने १२-५ अशी एकतर्फी मात केली. कझाकिस्तान आणि इराणच्या खेळाडूवर मात करुन उपांत्य फेरीत दाखल झालेल्या बजरंगकडून भारताला पदकाच्या आशा होत्या. परंतू उपांत्य फेरीत […]
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्वप्नांना आणखी एक सुरुंग लागला आहे. भरवशाची कुस्तीपटू विनेश फोगाटचं आव्हान संपुष्टात आल्यावनंतर ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाचं आव्हानही संपुष्टात आलंय. उपांत्य फेरीत बजरंगवर अझरबैजानच्या हाजी अलीयेवने १२-५ अशी एकतर्फी मात केली.
ADVERTISEMENT
कझाकिस्तान आणि इराणच्या खेळाडूवर मात करुन उपांत्य फेरीत दाखल झालेल्या बजरंगकडून भारताला पदकाच्या आशा होत्या. परंतू उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर आता बजरंगला कांस्यपदकासाठी रेपिचाज राऊंडमध्ये खेळावं लागणार आहे.
हाजी अलीयेवने पहिल्याच राऊंडमध्ये चांगली कामगिरी करत बजरंगवर दबाव आणला. बराच वेळ गेल्यानंतरही हाजीने आक्रमण न केल्यामुळे पंचांनी त्याला ३० सेकंदात गुण मिळवण्याचं लक्ष देत पॉईंट मिळवण्याचं आव्हान दिलं. परंतू यातही तो अपयशी ठरला आणि बजरंगला एक गुण मिळाला. उत्कृष्ट बचाव हे हाजी अलीयेवच्या आजच्या सामन्यातल्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. मोक्याच्या क्षणी बजरंगच्या पायाची पकड घेत हाजीने ४ गुणांची कमाई केली. इतकच नव्हे तर बजरंगने सर्व प्रयत्न त्याने हाणून पाडले.
हे वाचलं का?
दुसऱ्या राऊंडवरही पूर्णपणे हाजी अलीयेवचं वर्चस्व पहायला मिळालं. बजरंगला झुंजवत त्याच्या पायांवर पकड मिळवण्यात हाजी यशस्वी झाला. धडाघड पॉईंटची कमाई करत हाजीने आपली आघाडी वाढवली. सामना संपायला अवघी काही मिनीटं शिल्लक असताना बजरंगने ४ गुणांची कमाई केली खरी परंतू तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. १२-५ च्या फरकाने हाजीने या सामन्यात बाजी मारत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT