Tokyo Olympics : पहिल्याच प्रयत्नात रवी कुमारचं ‘चंदेरी’ यश
५७ किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये सुवर्णपदकाचं भारताचं स्वप्न भंगलेलं आहे. भारताच्या रवी कुमारला अंतिम फेरीत रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या झावुर कडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सेटच्या सुरुवातीला दोन्ही मल्ल एकमेकांचा अंदाज घेण्यात वेळ वाया घालवत होते. परंतू यानंतर रशियन खेळाडूने सामन्यावर वर्चस्व मिळवत रवी कुमारला बॅकफूटवर ढकललं. रवी कुमारने या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
५७ किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये सुवर्णपदकाचं भारताचं स्वप्न भंगलेलं आहे. भारताच्या रवी कुमारला अंतिम फेरीत रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या झावुर कडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हे वाचलं का?
पहिल्या सेटच्या सुरुवातीला दोन्ही मल्ल एकमेकांचा अंदाज घेण्यात वेळ वाया घालवत होते. परंतू यानंतर रशियन खेळाडूने सामन्यावर वर्चस्व मिळवत रवी कुमारला बॅकफूटवर ढकललं.
ADVERTISEMENT
रवी कुमारने या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतू रशियन खेळाडूच्या बचावासमोर त्याचा निभाव लागला नाही.
ADVERTISEMENT
अखेरीस पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या रवी कुमारला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.
पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या रवी कुमारवर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT