Tokyo Olympics 2020 : कुस्तीपटूंनी पदकाची आशा वाढवली, रवी कुमार-दीपक पुनिया उपांत्य फेरीत दाखल
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्यासाठी नेहमी चर्चेत असलेला खेळ म्हणजे कुस्ती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आता आपल्या उत्तरार्धाकडे वळत असताना दोन भारतीय कुस्तीपटूंनी भारताला पदकाची आशा दाखवली आहे. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटातील फ्रिस्टाईल प्रकारात रवी कुमार दहीयाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रवीने ऑस्कर टिग्रेगोसचा technical superiority च्या निकषावर पराभव केला. यानंतर झालेल्या सामन्यात […]
ADVERTISEMENT

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्यासाठी नेहमी चर्चेत असलेला खेळ म्हणजे कुस्ती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आता आपल्या उत्तरार्धाकडे वळत असताना दोन भारतीय कुस्तीपटूंनी भारताला पदकाची आशा दाखवली आहे. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटातील फ्रिस्टाईल प्रकारात रवी कुमार दहीयाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रवीने ऑस्कर टिग्रेगोसचा technical superiority च्या निकषावर पराभव केला.
यानंतर झालेल्या सामन्यात रवी कुमारने बल्गेरियाच्या वांगेलोव्ह वेलेन्टीनोव्हचा १४-४ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज दुपारी रवी कुमार आपला उपांत्य फेरीचा सामना खेळेल. हा सामना जिंकला तर रवी कुमारचं पदक निश्चीत होईल. परंतू हा सामना रवीने गमावला तरीही त्याची पदकाची आशा कायम राहिल. रेपिचाज राऊंडमध्ये रवीला ब्राँझ पदकासाठी खेळण्याची संधी मिळेल.
Tokyo Olympics 2020 : भालाफेकीत भारताला पदकाची आशा, नीरज चोप्रा अंतिम फेरीत दाखल
दुसरीकडे ८६ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात भारताच्या दीपक पुनियाने धडाकेबाज खेळ करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. दीपकने चीनच्या झुशेन लीनचा ६-३ ने पराभव केला. त्याआधीच्या सामन्यात दीपक पुनियाने नायजेरियाच्या प्रतिस्पर्ध्यावर १२-१ ने मात केली होती. त्यामुळे या दोन्ही वजनी गटांमध्ये भारताला पदकाची आशा निर्माण झाली आहे.










