Tokyo Paralympics : यथिराजने ‘रौप्य’ पटकावत रचला इतिहास! भारताला 18वं पदक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो पॅरालिम्पिकच्या अखेरच्या दिवशीही भारतानं आणखी एका पदकाची कमाई केली. बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत एसएल 4 प्रकारात अंतिम सामन्यात सुहास यथिराजला पराभवाचा सामना करावा लागला, तर फ्रान्सच्या लुकास माजुरनं सुवर्ण पदक जिंकलं.

सुहास यथिराजने रौप्य पदक पटकावलं असून, टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय IAS अधिकारी ठरला आहे.

बॅटमिंटन पुरूष एकेरीच्या एसएल 4 अंतिम सामन्यात सुहास यथिराजचा मुकाबला फ्रान्सच्या लुकास माजुरशी झाला. अंतिम सामना तीन सेटपर्यंत चालला. पहिल्या सेटमध्ये सुहास यथिराजने जिंकला. मात्र, नंतरच्या दोन सेटमध्ये लुकास माजुरनं वापसी करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लुकास माजुरनं सुहास यथिराजचा 15-21, 21-17, 21-15 अशा फरकाने पराभव केला. सुहास यथिराजने रौप्य पदक मिळवलं असून, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅटमिंटन स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळालं आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी केलं अभिनंदन

ADVERTISEMENT

सुहास यथिराजने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं. अधिकारी म्हणून काम करत असताना खेळामध्येही स्वतःला झोकून देत केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. सुहास यथिराज उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्याचं अभिनंदन केलं आहे.

ADVERTISEMENT

2007 मध्ये IAS अधिकारी

सुहास यथिराज सध्या नोएडात डीएम म्हणून कार्यरत आहे. 2007 मध्ये तो IAS अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरूवात केली. UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यथिराजला पहिली पोस्टिंग आग्रा येथे मिळाली. कार्यालयीन कामातून वेळ मिळाल्यानंतर यथिराज बॅटमिंटन खेळायला जायचा. हळूहळू त्यात त्याने प्राविण्य मिळवलं.

बॅटमिंटनमध्ये भारताला तिसरं पदक

टोकियो पॅरालिम्पकमध्ये बॅटमिंटन खेळ प्रकारात भारताने तीन पदक पटकावली आहेत. भारताच्या प्रमोद भगतने सुवर्ण पदक जिंकलं. एसएल 3 प्रकारात त्याने ही कामगिरी केली. तर मनोज सरकारनंही कांस्य पदक जिंकलं. त्यानंतर यथिराजने रौप्य पदक जिंकलं असून, बॅटमिंटनमध्ये भारताल सुवर्ण, रौप्य आणि कांस्य तीनही पदकं मिळाली आहेत.

भारताची सर्वोत्तम कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची एकूण 18 पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 53 वर्षात झालेल्या 11 पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने 12 जिंकली आहेत. यात 4 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत 1968 पासून पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असून, 1976 व 1980 मध्ये भारत सहभागी झाला नव्हता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT