Video: 'हेड'ची फलंदाजी पाहून डोकंच धराल! ट्रेविसची विश्वविक्रमाला गवसणी, 'या' दिग्गजांचा रेकॉर्ड मोडला
Travis Head Fastest T20 Fifty For Australia : आयपीएल 2024 मध्ये वादळी खेळी करणाऱ्या हैदराबाद संघाचा सलामीचा फलंदाज ट्रेविस हेड पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज फलंदाजाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ट्रेेविस हेडने क्रिकेटमध्ये रचला इतिहास
ट्रेविस हेडने वादळी खेळी करून दिग्गज फलंदाजांचा विक्रम मोडला
ट्रेविस हेडच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल
Travis Head Fastest T20 Fifty For Australia : आयपीएल 2024 मध्ये वादळी खेळी करणाऱ्या हैदराबाद संघाचा सलामीचा फलंदाज ट्रेविस हेड पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज फलंदाजाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. स्कॉटलँडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवून ट्रेविस हेडने संघाला 10 षटकांमध्येच विजय मिळवून दिलं. स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात 155 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर या धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 9.4 षटकात तीन विकेट्स गमावून 156 धावा करुन सामना 7 विकेट्सने खिशात घातला.
ट्रेविस हेडच्या वादळी खेळीचा व्हिडीओ पाहिलात का?
ट्रेविस हेडने त्याच्या इनिंगमध्ये 5 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीनं 25 चेंडूत 320.00 च्या स्ट्राईक रेटने 80 धावा कुटल्या. हेडने त्याच्या इनिंगमध्ये अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकून डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सेवलचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियासाठी टी-20 मध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकणार ट्रेविस हेड पहिला फलंदाज ठरला आहे. या अर्धशतकीय खेळीमुळं ट्रेविस हेडने ऑस्ट्रेलियासाठी सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकून मार्कस स्टॉयनिसची बरोबरी केली आहे. वर्ष 2022 मध्ये स्टॉयनिसने श्रीलंकेविरुद्ध 17 चेंडूत अर्धशतकीय खेळी साकारली होती.
ऑस्ट्रेलियासाठी टी-20 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक
- 17 चेंडू - मार्कस स्टॉयनिस विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ 2022
- 17 चेंडू - ट्रेविस हेड विरुद्ध स्कॉटलँड, एडनबर्ग,2024
- 18 चेंडू - डेविड वॉर्नर विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी, 2010
- 18 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध पाकिस्तान, मीरपूर, 2014
- 18 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध श्रीलंका, कोलंबो 2016
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT