Vinesh Phogat : विनेशला रौप्य पदक मिळणार की नाही? निर्णय होणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

vinesh phogat medal case update will get silver medal or not final decision announce today paris olympic 2024
विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) याचिका दाखल केली होती.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विनेश फोगटच्या याचिकेवर आज फैसला

point

विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही?

point

विनेश फोगाटकडून हरिश साळवे यांनी कोर्टात बाजू मांडली.

Vinesh Phogat Medal Case Update : सुवर्ण पदकाची पक्की दावेदार असलेल्या विनेश फोगट हीच्या पदरात आता रौप्यपदक पडतं की नाही? याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे. 100 ग्रॅम वजन जास्त आढल्यामुळे विनेशला ऑलिम्पिकमधून (Paris olympic 2024) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.त्यानंतर विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज निर्णय येणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (vinesh phogat medal case update will get silver medal or not final decision announce today paris olympic 2024) 

विनेश फोगटने CAS समोर पॅरिस ऑलिम्पिकमधील अनेक अनियमिततांचा खुलासा केला होता. पॅरिस ऑलिम्पिकमधील कमतरता दाखवताना तिने वजन का कमी करता आलं नाही? याबाबतची माहिती देखील दिली होती. विनेशनुसार रेसलिंग वेन्यू आणि एथलिट विलेजमध्ये बरंच अंतर होतं. त्याशिवाय सामन्यांच शेड्यूलही खूप व्यस्त होतं. त्यामुळे ती आपली वजन कमी करू शकली नाही, असे कारण विनेशने सांगितले आहे. 

हे ही वाचा : Raj Thackeray : ''शरद पवारांसारखा 83 वर्षांचा माणूस...'', राज ठाकरे काय बोलून गेले?

दरम्यान भारतीय ऑलिम्पिक संघ आणि विनेश फोगाटकडून हरिश साळवे यांनी कोर्टात बाजू मांडली. भारतीय कुस्तीपट्टू विनेशला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेशीर बाजू मांडली. या प्रकरणात 9 ऑगस्टला 3 तास सुनावणी पडली. ही सुनावणी एनाबेल बेनेट यांच्यासमोर झाली. विनेश फोगटच्या खटल्याच्या सुनावणीनंतर आता क्रीडा लवाद न्यायालय 10 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता अंतिम आणि ऐतिहासिक निर्णय देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

CAS नेमकं आहे काय? 

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट Court of Arbitration for Sport (CAS) ही जगभरातील खेळांसाठी तयार केलेली एक स्वतंत्र संस्था आहे. खेळाशी संबंधित सर्व कायदेशीर विवाद निकाली काढणे हे त्याचे काम आहे. 1984 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संस्था लवादाद्वारे खेळाशी संबंधित वाद सोडवण्याचे काम करते.त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे आहे आणि त्याची न्यायालये न्यूयॉर्क शहर, सिडनी आणि लॉझने येथे आहेत. सध्याच्या ऑलिम्पिक यजमान शहरांमध्येही तात्पुरती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. या क्रमाने, यावेळी पॅरिसमध्ये CAS ची स्थापना झाली.

हे ही वाचा : Aishwarya rai: "मी आणि ऐश्वर्या घटस्फोट घेत आहोत", अभिषेकच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

प्रकरण काय? 

विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने भारताला मोठा धक्का बसला होता. 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती गटाच्या अंतिम सामन्याच्या काही तास आधी, विनेशचे वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याचे आढळून आले होते. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्याने अंतिम सामन्याच्या काही तास आधी तिला अपात्र ठरवण्यात आले. अशा परिस्थितीत नियमांमुळे उपांत्य फेरीत विजय मिळवूनही तिचे पदक हुकले. मात्र आता प्रकरण CAS कडे गेल्यानंतर विनेशच्या पदकाची आशा पुन्हा जागृत झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT