विराट म्हणाला संघातले तरुण खेळाडू अनिल कुंबळेला घाबरुन असायचे – माजी CoA प्रमुख विनोद राय
२०१७ च्या चॅम्पिअन्स ट्रॉफी दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात भारताला स्विकारावा लागलेला मानहानीकारक पराभव आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातला वाद चांगलाच गाजला होता. या दोघांच्याही वादावर अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. आज या कथित वादावर बीसीसीआयच्या Committee of Administrators (CoA) चे माजी प्रमुख विनोद राय यांनी महत्वाचं स्पष्टीकरण दिलं […]
ADVERTISEMENT

२०१७ च्या चॅम्पिअन्स ट्रॉफी दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात भारताला स्विकारावा लागलेला मानहानीकारक पराभव आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातला वाद चांगलाच गाजला होता. या दोघांच्याही वादावर अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. आज या कथित वादावर बीसीसीआयच्या Committee of Administrators (CoA) चे माजी प्रमुख विनोद राय यांनी महत्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Not Just a Nightwatchman — My Innings in the BCCI या आपल्या आगामी पुस्तकात विनोद राय यांनी विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादाबद्दल माहिती दिली आहे. या दोघांमधील वाद प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती असंही राय यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातले संबंध चांगले नव्हते हे विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे. “मी ज्यावेळी कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटशी संवाद साधला तेव्हा मला असं सांगण्यात आलं की कुंबळे हा खूप शिस्तप्रिय होता आणि त्यामुळे काही खेळाडू त्याच्यावर नाराज होते. मी याबद्दल नंतर विराट कोहलीशी बोललो त्यावेळी त्याने मला सांगितलं की अनिल कुंबळे ज्या पद्धतीने खेळाडूंशी वागतो ते पाहून संघातील काही तरुण खेळाडू हे अनिल कुंबळेला घाबरुन असतात”.
अनिल कुंबळेने CoA ला दिलेल्या स्पष्टीकरणात, मी संघाच्या हितासाठी जे योग्य आहे त्या पद्धतीने वागत आल्याचं सांगितलं. निर्णय घेण्याआधी काही खेळाडूंना असलेल्या प्रॉब्लेमऐवजी मी मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेल्या यशस्वी कामगिरीचा विचार केला जावा असं सांगितलं. आपल्या पुस्तकात राय यांनी अनिल कुंबळेसोबत झालेल्या संभाषणाचाही दाखला दिला आहे.