Virat Kohli Vs Gautam Gambhir Fight : गंभीर-कोहलीत मैदानातच का भिडले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Virat Kohli and Gautam Gambhir were seemingly involved in a war of words after Royal Challengers Bangalore defeated Lucknow Super Giants
Virat Kohli and Gautam Gambhir were seemingly involved in a war of words after Royal Challengers Bangalore defeated Lucknow Super Giants
social share
google news

Virat Kohli Vs Gautam Gambhir Fight in IPL Video : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर आणि अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली. सामना सुरू असताना नवीन उल हक आणि विराट कोहलीचा शाब्दिक संघर्ष झाला. सामना संपल्यानंतर कोहली, गंभीर मैदानातच भिडले. त्यामुळे सगळ्याच खेळाडूंना यात मध्यस्थी करावी लागली. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

लखनऊमध्ये आरसीबी आणि एलएसजी यांच्यात सामना झाला. यात बंगळुरूने लखनऊला 18 धावांनी पराभूत केलं. मात्र, हा सामना चर्चेत आला तो झालेल्या वादामुळे. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला, तर त्यानंतर गौतम गंभीर आणि कोहलीत बाचाबाची झाली. याचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर, नवीन उल हक; मॅचदरम्यान काय झालं?

गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या वादाचं मूळ ठरलं नवीन उल हक. त्यानंतर कोहली आणि गंभीर 2013 नंतर पुन्हा एकदा सामने-सामने आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सामना सुरू असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला. त्यावेळी अमित मिश्राने मध्यस्थी करत कोहलीला दूर नेलं. मात्र, कोहली काहीतरी बोलत होता. त्यावेळी पंचांनी कोहलीसोबत चर्चा केली. नवीन उल हक ला सांगावं असं कोहली म्हणत होता. पण, सामना संपल्यानंतर वाद आणखी वाढला.

ADVERTISEMENT

हेही बघा >> VIDEO : आयपीएलच्या मैदानात तुफान राडा,फॅन्स आपापसातच भिडले

ADVERTISEMENT

सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी हस्तांदोलन केलं. दोघांमध्येही संभाषणही झालं. मात्र, त्यानंतरच वाद वाढला. दोघेही एकमेकांना काहीतरी बोलले आणि हात झटकले. त्यानंतर काईल मेयर्स आणि विराट कोहली एकमेकांशी बोलत होते.

हेही वाचा >> खेळाडू खरेदी करण्यासाठी संघाकडे पैसे कसे येतात, कमाई कशी होते?

त्याचवेळी गौतम गंभीर आला आणि त्याने काईल मेयर्स विराट कोहलीपासून दूर नेले. हे झाल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना काहीतरी बोलले. त्यानंतर गौतमी गंभीर पुन्हा कोहलीच्या दिशेने बोलत येतो. गंभीरला केएल राहुल आणि मोहसीन खान थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, गंभीर पुढे चालून गेला.

गौतम गंभीर कोहलीच्या जवळ गेल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक ठिणग्या उडाल्या. कोहली गंभीरला समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, गंभीरचं बोलणं सुरूच असल्याचं दिसत आहे. दरम्यान, फाफ डूप्लेसी आणि लखनऊचे अस्टिस्टंट कोच विजय दहिया यांनी दोघांना दूर केले.

केएल राहुलकडून मध्यस्थी

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. केएल राहुल आणि विराट कोहली बाजूला उभे राहुन बोलताना व्हिडीओत दिसत आहे. कोहली त्याला प्रकरण समजावून सांगत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी नवीन उल हक त्यांच्याजवळून जातो. केएल राहुल त्याला कोहली सोबतचा वाद संपवण्यास सांगतो मात्र, नवीन त्याला नकार देताना दिसत आहे.

आधीपासूनच कोहली-गंभीरमध्ये वाद

माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील संबंध आधीपासूनच वादात आहेत. 2013 मध्ये आयपीएलदरम्यान दोघांमध्ये वाद झाला होता. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान लखनऊने आरसीबीचा पराभव केल्यानंतर गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना तोंडावर बोट ठेवून चूप राहण्याचे हावभाव केले होते. लखनऊला पराभूत केल्यानंतर विराट कोहलीनेही असंच केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT