Richard Kettleborough : कोहलीच्या शतकासाठी दिला नाही वाइड बॉल, नियम की फिक्सिंग?
Richard Kettleborough Wide Controversy : वाइड बॉलवरून सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. वाइड बॉलवर का झाला गोंधळ, काय आहे याबाबत नियम? पंच रिचर्ड केटलबरो कोण आहेत? हेच सोप्या भाषेत समजावून घ्या…
ADVERTISEMENT

Virat Kohli Richard kettleborough Wide ball controversy : तारीख 19 ऑक्टोबर 2023. ठिकाण पुण्यातील एमसीएचे गहुंजे मैदान. विश्वचषकातील 17 सामना भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू होता. सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण सगळ्यांचं लक्ष होतं ते विराट कोहलीच्या शतकाकडे. कारण कोहली शतकापासून 3 धावा दूर होता. त्याच्या शतकासाठी केएल राहुल त्याला सतत स्ट्राईक देत होता, जेणेकरून तो शतक पूर्ण करू शकेल. (Why was Richard kettleborough the wide ball not given?)
दरम्यान, डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज नसुम अहमद बांगलादेशकडून 42 वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने पहिलाच चेंडू लेग साइडच्या दिशेने टाकला. हा चेंडू वाइड द्यायला हवा होता, असे काही चाहत्यांना वाटले. पंच रिचर्ड केटलरो यांनी वाइड न दिल्याने पक्षपातीपणापासून ते फिक्सिंगपर्यतची चर्चा झाली. विराट कोहलीला शतक झळकावण्याची संधी देण्यासाठी हे केलं असंही बोललं जात आहे.
हे ही वाचा >> कोहलीने बांगलादेशचे स्वप्न मिळवले धुळीस! पुण्यात भारताचा मोठा विजय
या WIDE बॉलच्या निर्णयाने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये ‘महाभारत’ सुरू झाले. अनेकांचं म्हणणं असं होतं की, तो स्पष्टपणे वाइड बॉल होता. वाइड बॉलवरून सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे. वाइड बॉलवर का झाला गोंधळ, काय आहे याबाबत नियम? पंच रिचर्ड केटलबरो कोण आहेत? हेच सोप्या भाषेत समजावून घ्या…
वाइड बॉल का दिला नाही?
अंपायर कोणत्या परिस्थिती वाइड बॉल देऊ शकत नाही? या संदर्भात, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) चे नियम पाहिले. MCC च्या नियम 22.4 नुसार, खालील परिस्थितीत वाइड बॉल देता येत नाही. मार्च 2022 मध्ये WIDE बॉलच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले होते.