WPL : RCB चा सलग दुसरा पराभव, स्मृती मंधाना भडकली, ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार
Wpl Smriti mandhana angree on team mates : भारतात वुमेन्स प्रिमियर लीगला सुरुवात झाली असून एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहे. त्यात आता कर्णधार स्मृती मंधानाच्या (Smriti mandhana) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (Royal Challengers Banglore) संघाला सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर स्मृती मंधना संघातील खेळाडूवर चांगलीच भडकली आहे. मॅच नंतर […]
ADVERTISEMENT
Wpl Smriti mandhana angree on team mates : भारतात वुमेन्स प्रिमियर लीगला सुरुवात झाली असून एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहे. त्यात आता कर्णधार स्मृती मंधानाच्या (Smriti mandhana) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (Royal Challengers Banglore) संघाला सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर स्मृती मंधना संघातील खेळाडूवर चांगलीच भडकली आहे. मॅच नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तिने संघाच्या फलंदाजीवर भाष्य करत खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत.(wpl 2023 our batters got starts but couldnt make it count says rcb smriti mandhana after losing with mumbai indians)
ADVERTISEMENT
Ind vs Aus : विराट कोहली, चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचं कसं वाढवलं टेन्शन?
वुमेन्स आयपीएलमध्ये सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (Royal Challengers Banglore) विरूद्ध मुंबई (mumbai indians) असा सामना रंगला होता.या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ९ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात हेली मैथ्युजची मोलाची भूमिका बजावली. हेलीने या सामन्यात गोलंदाजी करताना ३ विकेट घेतल्या, तर फलंदाजी दरम्यान ७७ धावांची अर्धशतकी खेळी केली. या तिच्या उत्कृष्ट खेळीच्या बळावर मुंबईने हा विजय मिळवला. तर बंगळूरूचा हा सलग दुसरा पराभव ठरला. त्यामुळे या पराभवानंतर ती चांगलीच संतापली होती.
हे वाचलं का?
आम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची होती, पण आम्हाला ती करता आली नाही. त्यामुळे आम्हाला पराभव स्विकारावा लागेल, असे स्मृती मंधाना सामन्यानंतर म्हणाली होती. आम्हाला आमच्या चुका स्विकाराव्या लागतील आणि चांगले पुनरागमन कराव लागेल, दोन तीन खेळाडूंना चांगली सुरूवात केली होती. त्यांनी २० धावांचा आकडाही पुर्ण करता आला होता, मात्र या चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलता आली नाही. ज्यामध्ये माझाही समावेश आहे, असे मंधाना म्हणते. तसेच आमच्याकडे गोलंदाजीसाठी ६-७ पर्याय होते. पण फलंदाजांनीच रन बनवले नसल्याने आम्हाला गोलंदाजीत फारसं काही करता आले नाही.
WPL 2023 : मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरूच: RCB चा केला दारुण पराभव
ADVERTISEMENT
असा रंगला सामना
बंगळूरूने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कर्णधार मंधाना आणि सोफी डिवाइनने संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती.दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४.२ ओव्हरमध्ये ३९ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर डिवाईन १६ वर आणि मंधाना २३ धावा करून आऊट झाली होती. या दोघांच्या विकेटनंतर एकामागून एक विकेट पडत गेले. त्यानंतर छोट्या मोठ्या पार्टनरशीप झाल्या होत्या. आणि बंगळुरू संघाने १५५ धावांचा डोंगर उभारला.
ADVERTISEMENT
WPL Kiran Navgire: सोलापूरच्या पोरीनं बॅटवर लिहलं धोनीचं नाव, ठोकलं अर्धशतक
बंगळुरूने (Royal Challengers Banglore) दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली होती. मुंबईच्या हेलीने ७७ आणि नॅट ब्रंटने ५५ धावा ठोकल्या. या धावांच्या बळावर मुंबईने बंगळूरूवर सहज विजय मिळवला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT