अर्जून तेंडुलकरनं पहिलं शतक अन् चर्चेत आला युवराजच्या वडिलांचा गुरुमंत्र
मुंबई : वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर याने रणजीमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकलं. अर्जूनच्या या शतकाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला क्रिकेट फॅन्स मात्र भारतीय क्रिकेटर युवराज सिंहच्या वडिलांनी अर्जूनला दिलेल्या गुरुमंत्राची तारीफ करत आहेत. बापा तसा लेक… अर्जून तेंडुलकरने रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात राजस्थानविरुद्ध खेळताना शतक लगावलं. […]
ADVERTISEMENT
मुंबई : वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर याने रणजीमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकलं. अर्जूनच्या या शतकाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला क्रिकेट फॅन्स मात्र भारतीय क्रिकेटर युवराज सिंहच्या वडिलांनी अर्जूनला दिलेल्या गुरुमंत्राची तारीफ करत आहेत.
बापा तसा लेक…
अर्जून तेंडुलकरने रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात राजस्थानविरुद्ध खेळताना शतक लगावलं. योगायोग म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही १९८८ मध्ये रणजीत पदार्पणातच गुजरात विरुद्धच्या सामन्यात शतक झळकवलं होतं आणि तेही डिसेंबर महिन्यातच. एकीकडे बाप आणि लेकाच्या या अनोख्या योगायोगाची चर्चा सुरू आहे.
अशातच दुसऱ्या बाजूला अर्जूनच्या या यशात भारतीय क्रिकेटर युवराज सिंहचे वडिल योगीराज सिंह यांचा गुरुमंत्र कामी असल्याच फॅन्सचं म्हणणं आहे. याचा किस्सा इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला योगराज यांनी दिलेल्या मुलाखतीतून समोर आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
योगराजच्या यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर महिन्यात युवराज सिंगने त्यांना फोन केला आणि २ आठवड्यांसाठी अर्जूनला प्रशिक्षण देण्याची विनंती केली. तसंच याबाबत सचिनची तशी इच्छा असल्याचंही युवीने योगराज यांना आवर्जून सांगितलं होतं. त्यावेळी योगराज यांनी त्यांच्या कडक शिस्तीची आठवण करत आपल्या प्रशिक्षणात कोणी हस्तक्षेप न करण्याची अटही युवराजकडे स्पष्ट केली होती.
सप्टेंबर महिन्यातल्या या संवादानंतर अर्जूनने युवराजच्या वडिलांकडे १५ दिवस प्रशिक्षण घेतलं होतं. अर्जूनच्या रणजीतल्या यशानंतर योगराज यांच्याबरोबर अर्जूनच्या प्रॅक्टीसचा एक फोटो आता व्हायरल होतोय. यावेळी योगराज यांनी अर्जूनला १५ दिवसांसाठी तु सचिनचा मुलगा आहेस, हे विसरुन जा, असा सल्ला दिला होता. आता गोव्यातील रणजी सामन्यात शतक लगावल्यानंतर योगराज यांनी दिलेल्या गुरुमंत्रामुळेच अर्जून यशस्वी झाल्याची चर्चा तेंडूलकर आणि युवीचे फॅन्स करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT