T-20 World Cup : भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा लूक पाहिलात का? BCCI ने शेअर केला फोटो

१७ ऑक्टोबरपासून युएई-ओमानमध्ये सुरु होणार विश्वचषक स्पर्धा
T-20 World Cup : भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा लूक पाहिलात का? BCCI ने शेअर केला फोटो

टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची अधिकृत जर्सी आज लाँच केली आहे.

१७ ऑक्टोबरपासून आधी स्पर्धेची पात्रता फेरी खेळवली जाईल. यानंतर २३ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया नवीन जर्सी घालून मैदानात उतरेल असं बीसीसीआयने जाहीर केलं होतं. त्यानुसार कॅप्टन विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, जाडेजा, बुमराह यांचा नव्या जर्सीतला लूक बीसीसीआयने रिव्हील केला आहे.

टीम इंडियाच्या आतापर्यंतच्या बहुतांश सर्व जर्सी या निळ्या रंगातल्याच होत्या. नवीन जर्सीतही निळा रंग कायम ठेवण्यात आला असून गडद निळ्या रंगावर फिकट निळ्या रंगाच्या रेषांचं डिजाईन करण्यात आलं आहे.

T-20 World Cup : भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा लूक पाहिलात का? BCCI ने शेअर केला फोटो
T-20 World Cup : एकही पैसा न घेता धोनी भारतीय संघाला करणार मार्गदर्शन - जय शहांचं स्पष्टीकरण

भारतीय संघ या स्पर्धेत ग्रूप बी मध्ये खेळणार असून २४ तारखेला भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. यानंतर थेट भारतीय संघ ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. हे दोन्ही सामने अबुधाबीच्या मैदानावर खेळवले जातील यानंतर ३ नोव्हेंबरला भारतीय संघ अफगाणिस्तानचा सामना करणार आहे.

T-20 World Cup : भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा लूक पाहिलात का? BCCI ने शेअर केला फोटो
T-20 World Cup मध्ये यंदा पहिल्यांदाच DRS चा वापर, ICC चा महत्वपूर्ण निर्णय

Related Stories

No stories found.