T20 World Cup 2022 Squads: भारत-पाकिस्तानसह 12 देशांचे संघ जाहीर, जाणून घ्या स्क्वॉड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची आधीच घोषणा केली आहे. T-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. यावेळी स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत. यापैकी 8 जण थेट गट-12 साठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित 4 संघ पात्रता फेरी […]
ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची आधीच घोषणा केली आहे. T-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.
यावेळी स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत. यापैकी 8 जण थेट गट-12 साठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित 4 संघ पात्रता फेरी जिंकून आपले स्थान निश्चित करणार आहेत. या पात्रता फेरीत 8 संघ आमने-सामने असणार आहेत. आतापर्यंत गट-12 आणि पात्रता फेरीतील सर्व 16 संघांपैकी 12 संघांनी आपले संघ घोषित केले आहेत. तर ग्रुप-12 मध्ये फक्त न्यूझीलंडनेच अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. यूएई, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांनी पात्रता फेरीतील त्यांचे संघ अद्याप घोषित केलेले नाहीत.
विश्वचषक-2022 जाहीर झालेले संघ
सुपर-12, गट-1
ऑस्ट्रेलियन संघ: अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा.