T20 World Cup : दुबईत आज दोन शेजारी आपापसात भिडणार, जाणून घ्या विजयाची आकडेवारी काय सांगते?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले की संपूर्ण जगभरात त्याची चर्चा झालीच म्हणून समजा. सध्या बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये सामने खेळवले जात नाहीत. आयसीसी स्पर्धांचा अपवाद वगळला तर आता हे संघ एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. २४ तारखेला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. २०१९ वर्ल्डकपनंतर भारत-पाकिस्तान समोरासमोर येणार आहेत, त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

आता प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीच्या मनात हा प्रश्न असेल की २४ तारखेच्या सामन्यात बाजी कोण मारणार? भारत की पाकिस्तान? दोन्ही संघांमधील आतापर्यंतच्या सामन्यांची विजयाची आकडेवारी काय सांगते याचा आपण आढावा घेणार आहोत.

T20 World Cup : ६-० च्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार, पाकिस्तानविरुद्ध आज महामुकाबला

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तानकडून आतापर्यंत कधीच हरलेला नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या १० वर्षांचा टी-२० क्रिकेटमधला रेकॉर्ड तुम्ही तपासून पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की भारताची बाजू ही पाकिस्तानच्या नेहमी वरचढ राहिली आहे.

गेल्या १० वर्षांत पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली कामगिरी –

ADVERTISEMENT

  • सामने – १२९

ADVERTISEMENT

  • विजय – ७७

  • पराभव – ४५

  • बरोबरी – २

  • अनिर्णित – ५

  • विजयाची टक्केवारी – ५९.७

  • गेल्या १० वर्षांत भारताची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली कामगिरी –

    • सामने – ११५

    • विजय – ७३

    • पराभव – ३७

    • बरोबरी – २

    • अनिर्णित – ३

    • विजयाची टक्केवारी – ६३.५

    याचसोबत २०१४ आणि २०१६ या दोन शेवटच्या टी-२० वर्ल्डपमध्ये पाकिस्तानची कामगिरी फारशी आश्वासक झालेली नाही. २०१४ साली पाकिस्तान Super 10 गटातून बाहेर पडला होता तर २०१६ सालीही पाकिस्तानचं आव्हान अशाच पद्धतीने संपुष्टात आलं होतं. त्यामुळे या आकडेवारीचा निकष ग्राह्य धरला तर रविवारीही भारताचीच बाजू वरचढ ठरेल यात काही शंकाच नाही.

    युएईच्या मैदानावर भारतीय खेळाडूंनी आताच आयपीएलचे सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात भारतीय खेळाडूंचं पारडं जड असणार आहे. परंतू पाकिस्तानचा संघही या मैदानावर सामने खेळला आहे. त्यामुळे आजचा सामना हा रंगतदार होण्याची आशा आहे.

    T20 World Cup : रोहित शर्माकडून भारताला आशा, परंतू पाकिस्तानविरुद्धची कामगिरी ठरु शकते चिंतेचा विषय

      follow whatsapp

      ADVERTISEMENT