Ind vs Aus T20 : विशाखापट्टणमध्ये ‘बदला’पूर? सूर्यकुमार ब्रिगेड कांगारूंना भिडणार
वर्ल्ड कपमधील पराभवानंतर काही कालावधीतच टीम इंडिया टी-20 सामन्यासाठी मैदानात सज्ज झाली आहे. त्यामुळे या सामन्यात कर्णधारपदही सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता विश्वचषकाच्या पराभवाचा वचपा टीम इंडिया कसा घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT

India vs Australia T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम (विझाग) येथे आज 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. वर्ल्ड कपमधील (World Cup) पराभवानंतर जवळपास 100 तासांनंतर टीम इंडिया नव्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरत आहे. या सामन्यात कर्णधारपदही सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे. त्यामुळे सूर्यकुमार (Suryakumar) जेव्हा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे, तेव्हा त्याच्या मनात विश्वचषकातील पराभवाची आठवण मात्र नक्कीच असणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरु होणार आहे. (t20i cricket match 2023 playing india vs australia suryakumar yadav new captain take revenge of rohit kohli shami)
पराभवाचे दुःख हलके होणार
वर्ल्डकपच्या पराभवानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका जिंकली तर मात्र त्या पराभवाचे दुःख हलके होणार नाही. मात्र कांगारूंचा पराभव केला मात्र क्रिकेटच्या चाहत्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. हा सामना होण्याआधी सूर्यकुमाराने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, टीम इंडियाला हा सामना कोणतेही दडपण न घेता खेळायला आवडणारे आहे.
🗣️ My message to the players is very clear – just be fearless and do whatever it takes to help the team 👌👌#TeamIndia Captain @surya_14kumar ahead of the 1st T20I against Australia.@IDFCFIRSTBank | #INDvAUS pic.twitter.com/jmjqqdcZBi
— BCCI (@BCCI) November 22, 2023










