'गोगावले तुम्हाला मी कितीदा सांगितलं माझ्यामध्ये...' अजितदादांचा चिमटा

Ajit Pawar on Bharat Gogawale: अजित पवारांनी सभागृहात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर अत्यंत बोचरी टिप्पणी केली. पाहा अजित पवार गोगावलेंना मंत्रिपदावरुन नेमकं काय म्हणाले.
अजित पवारांची आमदार भरत गोगावलेंवर बोचरी टीका
अजित पवारांची आमदार भरत गोगावलेंवर बोचरी टीका

Ajit Pawar: नागपूर: विधानसभा अधिवेशनाच्या (Vidhasabha Session) शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केली. याचवेळी शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) हे जेव्हा भाषणात आडकाठी करत होते तेव्हा अजित पवार संतापले. पण यावेळी त्यांनी आपला संताप अशा काही शब्दात व्यक्त केला की, अवघं सभागृहच पोट धरुन हसू लागलं. (gogawale how many times have I told you ajit pawar pinch laughter in the assembly hall)

पाहा अजित पवार आमदार गोगावलेंना नेमकं काय म्हणाले:

'गोगावले तुम्हाला कितीदा सांगितलं.. तुम्ही माझ्यामध्ये डिस्टर्बन्स आणू नका म्हणून.. तुम्ही जेवढी मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रिपद दूर जाईल. तुम्हाला माहित नाही माझे आणि एकनाथरावांचे काय संबंध आहेत ते..'

'काय तुम्हाला कळत नाही.. कठीण आहे.. तुम्ही आमदार आहात जरा समजून घ्या ओ...' असं म्हणत अजित पवारांनी भरत गोगावलेंना चांगलाच चिमटा काढला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in