सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंचा 'करेक्ट कार्यक्रम' कसा केला?

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतला शशिकांत शिंदे यांचा पराभव हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानेच शिंदेंना पराभूत केलं.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतला पराभव हा शशिकांत शिंदेपेक्षा शरद पवारांच्याच जास्त जिव्हारी लागणार आहे. शिंदे हे पवारांचे कट्टर, निष्ठावंत समर्थक आहेत. तुम्हाला, पवारांची साताऱ्यातली पावसातली सभा आठवतेय. या सभेनं पवारांच्या राजकारणातलं सातारचं महत्त्व नव्यानं अधोरेखित झालं. शिंदेच या सभेचे कर्तेधर्ते, शिल्पकार म्हणून ओळखले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे, शिवेंद्रराजे समर्थक राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने हा पराभव केलाय. शिवेंद्रराजेंनी हा करेक्ट कार्यक्रम कसा घडवून आणला, शिवेंद्रराजेंनाही कसा धक्का बसला, साताऱ्यातल्या या जय-पराजयाचा अर्थ काय, तेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in