
मुंबई तक राज्यसभा आणि त्यानंतर विधान परिषद अशा दोन्ही वेळी पंकजा मुंडेंना डावललं गेल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. रविवारी भाजप नेते आणि विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले प्रविण दरेकर यांना त्यांच्या या रोषाचा सामना करावा लागला. प्रवीण दरेकर यांचा ताफा बीड-उस्मानाबाद सीमेवरती रोखण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांकडून करण्यात आला.