सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नारायण राणेंच्या विजयाचे 4 अर्थ

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागला होती. या निवडणुकीत राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनेलचा विजय झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ठाकरे आणि राणे दोघांसाठीही खूप खास होती. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावरची कोकणातली ही पहिलीवहिली निवडणूक होती. त्यामुळे कोण कुणाची पाठ लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत राणेंच्या भाजपचं पॅनेल जिंकलं. १९ पैकी 11 जागा जिंकत सिद्धीविनायक पॅनेलने एकहाती सत्ता मिळवली. तर महाविकास आघाडीच्या समृद्धी पॅनेलला 8 जागा मिळाल्या. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत ही निवडणूक लढवली. पण इथे प्रतिष्ठा पणाला लागली होती, खुद्द ठाकरेंची आणि राणेंची. दोघांमधलं विळ्याभोपळ्याचं वैर महाराष्ट्राला चांगलं माहीत आहे. याच प्रतिष्ठेच्या लढाईत राणेंनी ठाकरेंना हरवलं. राणेंच्या विजयाचा अर्थ काय?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in