राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा अर्थ काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात काकापुतण्याचा संघर्ष फेमस आहे. आता पुन्हा एक काकापुतण्याची जोडी आमनेसामने येणार आहे.

ठाकरे बंधूंमधला विळ्याभोपळ्याचा सत्तासंघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं बघितलाय. आता याच संघर्षाला नवी धार मिळणार आहे. काका-पुतण्या आमनेसामने येणार आहेत. नव्यानंच हिंदुत्वाचा नारा दिलेल्या राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली. दुसरीकडे आदित्य ठाकरेंचाही दौरा समोर आलाय. काकांच्याआधीच पुतण्या अयोध्येत रामाच्या दरबारी हजेरी लावणार आहे. त्यामुळेच काकापुतण्याच्या या दौऱ्याचं महत्त्व काय, काकांचं अयोध्या गणित पुतण्या उलटं फिरवणार का, याबद्दलच आपण या व्हिडिओत बोलणार आहोत.

Related Stories

No stories found.