अजित पवारांचा दौरा अन् राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, चाललंय काय?

महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग सुरू झालंय. इनकमिंग सुरू असतानाच राष्ट्रवादीला दोन दिवसांत दोन मोठे झटके बसलेत.

राज्यभरातून इनकमिंग सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच गेल्या दोन दिवसांत दोन मोठे झटके बसलेत. दोन जिल्हाध्यक्षांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. रायगडमधील कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी राजीनामा दिला. लाड यांनी मुंबईत पक्ष कार्यालयाला राजीनामा पाठवला, तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगडमध्ये होते. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर इथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. परभणीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनीही राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे, राजीनामा सत्राचं नेमकं कारण काय, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in