
विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात दहाव्या जागेसाठी खरी चुरस आहे. भाईंना विधान परिषदेवर जाण्यासाठी १० मतांची गरज आहे तर प्रसाद लाड यांना २२ मतांची गरज आहे.शेवटच्या क्षणापर्यंत कुणाकडे किती मतांची जुळवाजुळव? किती अपक्ष आले मविआच्या साथीला?