प्रकाश आंबेडकरांनी समीर वानखेडेंना पाठिंबा का दिला?

नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम हा वाद रंगलाय. या वादात वानखेडेंना प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला.

नवाब मलिक आणि समीर वानखेडे वाद थांबता थांबत नाही. रोज नवेनवे दावे, प्रतिदावे केले जात आहेत. नवा वाद समोर येतो. समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम हा वाद तर आता थेट हायकोर्टात गेलाय. याच वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलंय. रविवारी मुंबईत प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर यांनी समीर वानखेडे यांची बाजू कशी कायद्यानं जमेची आहे, याबद्दल सुप्रीम कोर्टाचा हवाला देत माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in