Nitin Gadkari : सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी खुर्ची रिकामा ठेवायला सांगितली

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मीपण तेवढाच फटकळ आहे, तोंडावर बोलतो.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या मोकळ्याढाकळ्या, खुमासदार भाषणासाठी ओळखले जातात. पुणे येथे ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं सांस्कृतिक वैभव असल्याचे गौरवोद्गार काढले. सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल आपल्याला आदर का वाटतो, याचा किस्साही नितीन गडकरी यांनी सांगितला.

Related Stories

No stories found.