नितेश राणे यांच्या अटकेची मागणी का होतेय? नेमकं प्रकरण काय?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुलगा आणि आमदार नितेश राणे यांच्या अटकेची भीती बोलून दाखवली. कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी कणकवलीतील हल्ला प्रकरणाबद्दल भाष्य केलं.

परबांवरील जीवघेणा हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेची भीती केंद्रीय मंत्री राणे यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदूर्गात गेल्यावर आमदार राणेंच्या अटकेच्या चर्चांना उधाण आलंय. नितेश राणेंचं नाव आलेलं नेमकं प्रकरण काय, आणि शिवसैनिकांच तसंच नारायण राणेंचं म्हणणं काय, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in