
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठीही निवडणूक होत आहे. राज्यसभेसाठी भाजपने तीन उमेदवार जाहीर केले. त्यावेळेस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव चर्चेत आलं. भाजपने पियुष गोयल (Piyush Goyal) यांना पुन्हा संधी देताना 2014 मध्ये पक्षात आलेल्या अनिल बोडेंना (Anil Bonde) राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिसऱ्या जागेसाठी 2019 मध्ये भाजपमध्ये आलेल्या धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) उमेदवार म्हणून घोषित केलं. राज्यसभेची नाव ठरण्याआधी पंकजांचं नाव नेहमीप्रमाणे या उमेदवारीसाठी चर्चेत आलं. मात्र ती फक्त चर्चाच ठरली.