महाराष्ट्र एकीकरण समितीवर कर्नाटक सरकार बंदी घालणार?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने मराठी भाषिक सीमाभागात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अशातच आता महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची चर्चा सुरू झालीय.

बंगळूरूत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर आता कर्नाटक सरकारनं मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. सीमाभागात मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचा हालचाली सुरू केल्यात. दुसरीकडे बेळगाव महाराष्ट्राला देण्यासंदर्भात कोणाशीही चर्चा करणार नसल्याची आडमुठी भूमिका सरकारने घेतलीय. सोमवारी कर्नाटक विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी बेळगावबद्दलची वादग्रस्त भूमिका मांडली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in