Astrology : चातुर्मास सुरू होताच, 'या' राशींचे भाग्य उजळून निघेल
मुंबई तक
• 01:03 PM • 04 Jul 2026
Astrology : देवशयनी एकादशीच्या चातुर्मासाची सुरूवात होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णु योगनिद्रामध्ये प्रवेश करेल. यानंतर 20 नोव्हेंबर 2026 रोजी देवउत्थान एकादशीच्या योगनिद्रागमनाने चातुर्मास समाप्त होईल. याच काळात बदलणाऱ्या ग्रहस्थितीचा अनेक राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. मात्र, यापैकी काही राशींना शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


1/6
देवशयनी एकादशीच्या चातुर्मासाची सुरूवात होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णु योगनिद्रामध्ये प्रवेश करेल. यानंतर 20 नोव्हेंबर 2026 रोजी देवउत्थान एकादशीच्या योगनिद्रागमनाने चातुर्मास समाप्त होईल. याच काळात बदलणाऱ्या ग्रहस्थितीचा अनेक राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. मात्र, यापैकी काही राशींना शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे.


2/6
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. बऱ्याच काळापासून प्रबंलित असलेली कामे पू्र्ण होतील. व्यवसाय विस्ताराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी नोकरदरांना आदर आणि मान्यतेसह नवीन जबाबदार्या मिळू शकतात.
ADVERTISEMENT


3/6
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी चातुर्मास प्रगतीच्या नवीन संधी घेऊन येऊ शकतात. तुमची संवाद कौशल्य आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावते. काम आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता आहे.


4/6
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. बऱ्याच काळापासून खोळंबलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील.
ADVERTISEMENT


5/6
धनु
धनु राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीच्या नवीन संधी घेऊन येऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होतील आणि धार्मिक व आध्यात्मिक कार्यांकडे अधिक कल वाढेल. नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल.


6/6
मीन
मीन राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेक सुखद बदलांना अनुभव येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील. सृजनशील क्षेत्रातील क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT











